छक्के पंजे करणाऱ्या राजकारण्याला कायमचं घरी बसवा
कोणताही भ्रष्ट राजकारणी तो जनतेसाठी काहीही करत नसतो तो स्वतःसाठीच निवडून आलेला असतो फक्त निवडून येईपर्यंत तो जनतेचा असतो नंतर मात्र तो स्वतःचाच असतो,.. कितीही मोठे काम आहे मंजूर करून आणतील परंतु प्रत्येक कामामध्ये कमिशन मात्र कधी सोडणार नाहीत. आपल्या आजूबाजूला खूप योजना किंवा कामे राबवत असतील परंतु एकही क्वालिटीचं काम नसतं त्याचं प्रमुख कारण आता जनतेने शोधले पाहिजे की प्रमुख काळाची गरज आहे. नेहमी एक लक्षात घेतले पाहिजे “गरीब व सर्वसामान्यांच्या लेकरांना ते शिक्षण घ्या म्हणणार नाहीत, ते तुम्हाला अभ्यास करा म्हणणार नाहीत, ते तुम्हाला उच्च शिक्षित व्हा म्हणणार नाहीत, ते तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध करून देणार नाही. परंतू ते त्यांच्या मुलांना विदेशात शिकायला पाठवतील. ते तुम्हाला विरोधका बरोबर भांडणे करायला लावतील, दंगली घडवायला लावतील जाती धर्माच्या नावाने अपप्रचार करायला लावतील. त्यातून ते त्यांचा हेतू साध्य करून घेतील.ते तुम्हाला विदेशातून त्यांचा मुलगा शिकून आल्यावर त्याला आमदार , खासदार , मंत्री करण्यासाठी प्रचार करायला लावतील भावी अमुक – तमुक म्हणून. मग आपण आहेतच त्याच्यामागे पुढे फिरायला त्यामुळे *कुणाच्या बुद्धीचे हस्तक होण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीचे मालक व्हा…* हे भ्रष्ट लोक अमाप पैसा ,जमिनी , बेसुमार धन – दौलत कमवतील आणि हीच मालमत्ता पचवण्यासाठी, भीतीपोटी जो सत्तेत पक्ष असेल तिथे बेडका प्रमाणे उड्या मारतात मग या पक्षातून त्या पक्षात त्यापेक्षातून ह्या पक्षात प्रवेश करत राहतील मग आपल्या प्रमुख समस्यांचं काय? आपल्या प्रमुख समस्या तर महागाई ,, भ्रष्टाचार , शेतीमालाला भाव , जातीयता निर्मुलन म्हणून या प्रमुख समस्या जशा आहे तशाच आतापर्यंत राहिल्या. ह्या समस्या पोट तिडकीने सभागृहात मांडून सोडवणारा राजकारणी हवाय..!
बोले तैसा चाले!
त्याची वंदिन पावले॥
अंगे झाडीन अंगण I
त्याचे दासत्व करीन ॥
त्याचा होईना किंकर I
उभा टाकेन जोडोनी कर II
तुका म्हणे देव I
त्याच्या चरणी माझा भाव II
तुकाराम महाराजांच्या या काव्य प्रमाणे लोक शोधले पाहिजे ते आता काळाची गरज आहे असे लोक शोधणे फार अवघड गोष्ट नाही फक्त आपण पक्षाच्या आणि नेत्याच्या गुलामीचा चष्मा बाजूला काढून पाहिले पाहिजे आणि भ्रष्ट लोकांना कायमचं घरी बसवलं पाहिजे.
– अतुल शेलार, सामाजिक कार्यकर्ते, कुसळंब.