माणसाला माणूस पण देणारा – बाप माणूस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या वाचनाची भूक एवढी तीव्र आहे की एका पुस्तकाचे चार पान जरी वाचायचे राहिले तरी मला चैन पडत नव्हता.. एकदा मी पुस्तकात मग्न झालो की मला बाहेरचा काहीच घोंगाटा ऐकू येत नव्हता ज्ञानसाधना करणे हेच माझे वाचनाचे ध्येय आहे…
बाबासाहेब इतके विद्वान होते की, अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटी जगातील शिक्षा संस्थेमध्ये प्रमुख मानली गेली आहे. डॉक्टर बाबासाहेब याच विश्वविद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण घेतले होते तेथील विश्वविद्यालयाच्या दृष्टीने त्यांनी प्रमुख विषयावर अध्ययन केले होते.. सन 1654 मध्ये कोलंबिया यूनिवर्सिटी ची स्थापना झाली होती. या संस्थेला 250 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोलंबीयांनी आपल्या संस्थेतील आजी-माजी विद्यार्थ्यांतून 100 महान विद्वानांची यादी जाहीर केली होती त्या यादीत डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचे नाव प्रथम क्रमांक वर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संस्थेत 1916 मध्ये विद्यार्थी होते जगाच्या महान विद्वानांच्या यादीत अमेरिकेच्या तीन राष्ट्रपतीचे नाव सुद्धा आहेत.आणखी काही देशातील सहा राष्ट्राध्यक्षही आहेत कितीतरी असे विद्वान आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नाही तर या यादीमध्ये आईन्स्टीन नावाचा महान संशोधन सहाव्या क्रमांकावर होते… पण दुर्भाग्य आपलं आपल्या मीडियाने त्यावेळी बातमी दाखवली नाही परंतु अमेरिकी मीडियाने या बातमीची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यानंतर शंभर महाविद्वानांना निवडल्यानंतर जगभरातील विदनाच्या या कमिटीने डॉक्टर भीमराव आंबेडकर हे नाव प्रथम क्रमांक वर ठेवले व त्यानंतर या सर्वांचे नाव लिहिले गेले या स्मारकाला कोलंबिया विश्वविद्यालयाच्या एका प्रमुख जागेत लावले गेले.. भारतीय मीडियामध्ये या महान व्यक्तीच्या बातमीला जागा मिळू शकली नाही ही मोठी शोकांतिका आहे एवढेच नाही तर कोलंबिया ऑस्कर युनिव्हर्सिटीनी भारतातील शासनकर्त्यांना (म्हणजे सरकारला ) लिहून पाठवले आहे की तुमच्या देशातील या महान व्यक्तीला सन्मानपत्र मिळाले आहे तुम्ही हे सन्मानपत्र घेऊन जा. भारताची शान डॉक्टर आंबेडकर सारख्या महान सूर्याला येथील व्यवस्था ढगाळांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी या सूर्याच्या तेजाला झाकता येणे अशक्य गोष्ट आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्न नसून तर ते विश्वरत्न आहेत.. (बाबासाहेबांविषयी खूप काही लिहिण्यासारखा आहे लेख मोठा होईल त्यामुळे थोडक्यात आवरतो या महान मानवाला जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन…! )
– अतुल शेलार
सामाजिक कार्यकर्ते, कुसळंब.