संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट पहातीय जनता!
★पाटलांचा आदेश आला तर पिंगळे आणि साबळे यांना निवडून आणू सर्वसामान्य जनता
बीड | प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2024 रणसिंग फुंकल्यानंतर जरांगे पाटलांनी अंतरवलीतील घेतलेल्या बैठकीत अपक्ष उमेदवार देण्याचं ठरवलं आणि सर्वसामान्य जनतेने देखील आपल्या हिताचा उमेदवार कोण असू शकतो याचा शोध चालू केला आहे. जालना लोकसभेच्या निवडणुकीसाठी मंगेश साबळे यांचे नाव पुढे येत असून बीड लोकसभेसाठी किशोर पिंगळे यांचे नाव पुढे येत आहे. या दोघांना उमेदवारी दिली तर निवडून आणण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनतेवर राहील असं देखील सर्वसामान्य जनतेमधून सूर निघताना दिसत आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिला तर या दोघांनाही निवडून आणण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनता खांद्यावर घ्यायला तयार आहे, असे देखील सोशल मीडियावर बोलल जात आहे.
बीड लोकसभेच्या निवडणुकीत किशोर पिंगळे यांनी उतरावे असे सर्वसामान्य जनतेतून सूर निघत असून जालना लोकसभेसाठी मंगेश साबळे यांनी रिंगणात उतरावे सर्वसामान्य जनता दोघांच्या पाठीशी खंबीर उभे राहून लोकसभेला हे दोन मराठ्यांचे वाघ पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आदेशाचे वाट पाहत असलेली जनता आता फक्त उमेदवार घोषित करायचं राहिलं आहे. सर्वसामान्य जनतेमधून किशोर पिंगळे आणि मंगेश साबळे यांचे नावावर शिक्कामोर्तब आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहे. मराठासेवक म्हणून काम करताना किशोर पिंगळे आणि मंगेश साबळे यांना सगळ्यांनीच पाहिल आहे, म्हणूनच सर्वसामान्य जनतेमधून या दोन नावाची चर्चा सर्वात आधी पुढे आली आहे. हे दोन नाव जाहीर होतच सर्वसामान्य जनता कसून कामाला लागेल यात तीळ मात्र शंका नाही असेही बोलले जात आहे.
★किशोर पिंगळे यांचे सामाजिक काम आणि मराठा चळवळ जिल्हाभर पसरली!
राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे किशोर पिंगळे आज मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यासोबत सावली प्रमाणे असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांनी घर केल आहे. बीड लोकसभेला त्यांना जर उमेदवारी दिली तर चांगल्या मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनता घेतल्याशिवाय राहणार नाही तन-मन धन सर्वच वापरून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असेही बोलले जात आहे.
★मंगेश साबळे यांची आरक्षणाच्या लढाईतील आक्रमक चेहरा म्हणून ओळख
मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मंगेश साबळे यांनी गावच्या सरपंच पदापासून सुरू केलेली लढाई आज मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांना जर जालना लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर सर्वसामान्य जनता देखील तन-मन-धन लावून काम करेल आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असं बोललं जात आहे.