सरदवाडी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
कुसळंब | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरदवाडी याठिकाणी दिनांक 22/03/2024 रोजी बाल आनंद मेळावा पार पडला.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
वडापाव,पाणीपुरी,लस्सी,लिंबूसरबत, समोसा,इडली सांबर,चटकदार भेळ मॅगी तसेच फळांचे सलाड अशाप्रकारचे विविध स्टॉल लावण्यात आले होते.विशेष म्हणजे सर्व खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः हा बनवले होते.ह्या सर्व पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी पालकांनी व गावकऱ्यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.त्यामुळे विद्यार्थी पण खूप आनंदीत झालेले दिसले. अशा कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांनी गणितात शिकलेल्या आकडेमोडीचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करता आला तसेच संवाद कौशल्याचा पण विकास झालेला दिसून आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शितोळे सर,सहशिक्षक नारायण नरसाळे सर,विनोद आमले सर,बळीराम पांदे सर व दळवे सर यांनी परिश्रम घेतले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब पिंपळे,उपाध्यक्ष सौ कविता नवनाथ पवार,जालिंदर पवार,हनुमंत पवार तसेच सर्व पालक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.नाविन्यपूर्ण उपक्रम करणारी शाळा म्हणून सरदवाडी शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.