14.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

राज्यस्तरीय सुंदर शाळा अभियानात श्री खंडेश्वर विद्यालय जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी!

★निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री खंडेश्वर विद्यालयाची गगनभरारी!

पाटोदा | प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबवले गेले होते. शिक्षक विद्यार्थी पालक आणि समाज यांची शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी शैक्षणिक गुणवत्तेसह सामाजिक उपक्रमातून विद्यार्थी आणि शाळेची प्रगती व्हावी यासाठी राज्यभर हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात मागील पाच दशकापेक्षा अधिक काळापासून ज्ञानदानासह विविध सामाजिक राष्ट्रीय शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्रीडा क्षेत्रात गुणवत्तेचा चढता आलेख अशी वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रगत विद्या प्रसार मंडळ कुसळंब संचलित श्री खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सरस कामगिरी करत बीड जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्यातील शाळेमधून शैक्षणिक गुणवत्तेसह अध्ययन-अध्यापन व प्रशासन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धन सामाजिक व व्यक्तिगत स्वच्छता राष्ट्रीय एकात्मता व्यावसायिक शिक्षण मार्गदर्शन कला क्रीडा कौशल्याचा विकास इत्यादीच्या केलेल्या कामगिरीवर राज्यभर हे अभियान राबवण्यात आले होते. विविध उपक्रमांना गुणदान करत केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर तपासणी संपन्न झाली असून पाटोदा तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमधून तालुक्यातील प्रगत विद्या प्रसार मंडळ कुसळम संचलित श्री खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंबने भाग घेतलेल्या शाळेमधून बीड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय विभागीय या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवल्याने या शाळेस राज्य शासनाकडून पाच लक्ष रुपयाची बक्षीस मिळणार आहे. शैक्षणिक स्पर्धेत श्री खंडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसळंबणे केलेली ही कामगिरी स्तुत्य असून शाळेच्या या दैनंदिन्यमान यशात संस्थेचे सचिव आदरणीय किसनरावजी पवार माजी सभापती पाटोदा पंचायत समिती, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, प्राचार्य एस के पवार, पर्यवेक्षक व्ही बी शेलार सर, संचालक अभियान प्रमुख पायके सर, गवळी सर, जाधव सर, साळुंखे सर, तोडकर सर, पाटोळे सर, सांगळे सर, परजणे सर, सुकाळे सर, गंडाळ सर, काळे सर, पवार सर, चव्हाण सर, पोकळे सर, गव्हाणे सर, भराटे सर, गोंदवले सर, मुरमुरे सर, पवळ मॅडम, शिक्षकत्तर कर्मचारी कोळी मामा, जाधव मामा या सर्वांचे मार्गदर्शन लाभले असून सर्व विद्यार्थी पालक विविध सेवाभावी संस्था आजी माजी विद्यार्थी पंचक्रोशीतील गावकरी मंडळी शिक्षक शिक्षक उत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

★श्री खंडेश्वर विद्यालयाचे ज्ञानदाना आणि कोरोनातील योगदान महत्त्वाचे

श्री खंडेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ज्या पद्धतीने ज्ञानदानामध्ये सर्वात पुढे आले असून पर्यावरण संवर्धन सामाजिक उपक्रम धार्मिक अध्यात्माची जोड देत माणुसकी धर्माचे पालन करण्यासाठी कोरोना काळातील विद्यालयाचे राहिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे कोरोना काळामध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या शाळेतून अनेक कोरोना मुक्त होऊन स्वतःचं नवीन जीवन सुरू केला सुंदर आणि प्रसन्न वातावरणामुळे अनेकांना कोरोना असल्यासारखं सुद्धा वाटलं नाही इतकं प्रसन्न वातावरण श्री खंडेश्वर विद्यालयात असल्याने अनेकांना जीवनदान मिळालं आहे असं म्हटलं तर वावगं वाटायला नको…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!