★मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेचा पाटोदा तालुक्यात द्वितीय क्रमांक
पाटोदा | प्रतिनिधी
तालुक्यातील आय एस ओ मानांकित नफरवाडी जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
कोणतेही यश योगायोगाने मिळत नाही तर त्या मागे अविरत, सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. हे अधोरेखित करणारा निकाल म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पाटोदा शहरापासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेली नफरवाडी शाळा पाटोदा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.गुणवत्तेची कास धरत या शाळेने मागील काही वर्षांपासून शाळेला गुणवत्तेत पुढे आणले आहे. मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मेहनत घेत शाळेचा गुणात्मक दर्जा उत्तम ठेवला आहे.लोकसहभाग,माजी विद्यार्थ्यांचा सहभाग,शाळा व्यवस्थापन समिती सहभाग,गावचे सरपंच,उपसरपंच तसेच त्यांचे सर्व सहकारी,पालक ग्रामस्थ यांचा सहभाग त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी आदरणीय पिकवणे साहेब,जेष्ठ शिक्षण विस्तारअधिकारी बोंदार्डे साहेब,गव्हाणे साहेब,शिंदे साहेब,सुळे साहेब,कें.मुख्याध्यापक येवले सर यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन आणि नफरवाडी शाळेचे मुख्याध्यापक तथा पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख खंडागळे सर,मुरूमकर सर,काकडे मॅडम,वावरे मॅडम,अडाले सर,वाघमारे मॅडम,सर्व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे…!!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नफरवाडी या शाळेची ओळख कल्पकतेतुन वेगळी ओळख निर्माण करणारी एक उपक्रमशील शाळा म्हणून आहे.या उपक्रमशीलतेला दिशा देण्यासाठी एक दिशादर्शक उपक्रम म्हणजेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान होय.या अभियानाची अंमलबजावणी करताना शाळा पूर्वी राबवत असलेले उपक्रम आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील उपक्रम यांची एकत्रित बांधणी केल्याने शाळा भौतिकदृष्टीने आणि गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक समृद्ध होण्यास मदत झाली. या उपक्रमाची अंमलबजावणी करताना विद्यार्थी बचत बँक निर्मितीतून विद्यार्थ्यांना बचतीची सवय,परसबाग निर्मितीतून श्रमप्रतिष्ठा,एका राज्याचा अभ्यास करताना राष्ट्रीय एकात्मता,संस्कृतीची ओळख,मेरी माटी मेरा देश या मधून राष्ट्रभावना,महावाचन चळवळ या मधून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय,विविध सहशालेय स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव,तज्ञ व्यक्तीचे आरोग्य मार्गदर्शनातून निरोगी जीवन, दत्तक वृक्ष उपक्रमातून वृक्ष संवर्धन, स्वच्छता मॉनिटर मधून आरोग्याबरोबरच सामाजिक बांधिलकी,व्यावसायिकांच्या भेटीमधून स्वयंरोजगार कौशल्य विषयक शिक्षण, शालेय मंत्रिमंडळातून भारतीय लोकशाहीची ओळख,उपस्थिती ध्वज या उपक्रमातून वक्तशीरपणा व शिस्त,क्रीडा स्पर्धेमधून शारीरिक विकसन, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील गैरसमज दूर करणे,अशा कितीतरी मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये झाली. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम म्हणजे शाळेतील औपचारिक शिक्षणाच्या चाकोरीतून बाहेर जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा हा उपक्रम होय.यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडण होईल,आणि व्यक्तिमत्वाची घडण झालेले विद्यार्थी उद्या राष्ट्र उभारणीमध्ये मोलाचे योगदान देतील थोडक्यात विद्यार्थी घडणीतून राष्ट्र घडण…!!! मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी गावच्या सरपंच सौ. विद्याताई सवासे,उपसरपंच सौ.शितलताई तांबे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच त्यांचे सर्व सहकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर मंडलिक व सर्व सदस्य,शाळेसाठी वस्तूरूपाने तसेच आर्थिकरूपाने मदत करणारे सर्व पालक ग्रामस्थ तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी, विकासासाठी मार्गदर्शन करणारे पाटोदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पिकवणे साहेब जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी बोंदार्डे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
★शाळेच्या या यशाबद्दल तालुकाभरातून कौतुक केले जात आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अण्णासाहेब खंडागळे यांची मेहनतव क्त की खबर किसे है यहाँ ?
हमने ठान लिया तो दिन और रात एक साथ चलते है
सिर्फ साहिल पे तैरना किसे मंजूर है यहाँ ?
हम तो वो है,जो समंदर में कारवाँ साथ ले के चलते हैं.!
या उक्तीप्रमाणे शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक आण्णासाहेब खंडागळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. सरांना महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ ला आदर्श पुरस्कार मिळाला, आदर्श पुरस्कार शिक्षक कसा असावा हे त्यांनी बाकी सहकाऱ्यांना सोबत घेऊन दाखवून दिले. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर गावातील नागरिक, गावचे सरपंच, पालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांची पालक सभा शाळेत आयोजित करून शिक्षणाचे महत्त्व व शैक्षणिक वातावरण का महत्वाचे आहे हे पटवून दिले. गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ५ लक्षांपर्यंत लोकसहभाग जमा करून शाळेच्या विकासासाठी पाऊले उचलली व यातूनच पेव्हर ब्लॉक सर्व शाळेची विद्यार्थ्यांना गरजेची असणारी रंगरंगोटी, समाजाला प्रेरीत व जागी करणारी कुंपण भिंतीवरील चित्रे आज शिक्षकांची आणि ग्रामस्थांची मेहनत सर्व काही सांगून जात आहे.