पाटोदा तालुक्यात तडजोडीच्या बैठकीतून गोळीबार ; दोन जखमी
★दोन गट भिडले तिघे जखमी सर्वांची प्रकृती स्थिर चिखली येथील घटना
★एसपींच्या आदेशानंतर दोघांवर 307 च्या गुन्हा दाखल रिवाल्वरही केली जप्त!
पाटोदा | सचिन पवार
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर होतात जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे आदेश दिले च्या काही तासातच पाटोदा तालुक्यातील चिखली येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या गोळीबार दोघेजण जखमी झाले आहेत. लग्नात झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार बैठकीतून मिटवण्याच्या अनुषंगाने समोर आला होता परंतु बैठकीत टोकाची भूमिका घेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली यातील एका गटाने गोळीबार केला यातील एक गोळी तरुणाच्या डाव्या खांद्यात अडकली जिल्हा रुग्णालयात डॉक्टरनी वेळीच उपचार करून ती गोळी बाहेर काढली सध्या त्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे हा प्रकार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील चिखली गावात घडला आहे प्रशासनाच्या आदेशानुसार दोन्हीही गटावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान रिवाल्वरही जप्त करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
अमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील चिखली येथे रात्री उशिरा ही घटना घडली आहे. हवेत गोळीबार होताच गाव संपूर्ण जागे झाले याची माहिती अंमळनेर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली तोपर्यंत गावात तणावाचे वातावरण होते जखमींना तातडीने अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्र पाठवले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर बडे यांनी तपासणी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले डॉक्टर सदाशिव राऊत यांनी किशोर गाडे यांच्यावर शस्त्रक्रिया केली त्यांच्या खांद्यातील गोळी काढून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.राऊत यांनी सांगितले. या घटनेने परिसरात वातावरण भीतीचे निर्माण झाले असून प्रशासनाने यावर गंभीर दखल घेऊन अशा घटना घडू नयेत आणि परवानाधारकांनी आपल्या शासनाचा शास्त्राचा गैरवापर करू नये असेही नागरिकांना अपेक्षित आहेत.
★डी वाय एस पी ची तत्पर्तता परिस्थिती तात्काळ नियंत्रणात
अमळनेर हद्दीत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी अमळनेर पोलिसांना तात्काळ चिखली येथील घटनास्थळी दाखल होत येथील परिस्थितीचा आढावा घेत वरिष्ठांच्या कानावर ही घटना घातली होती चिखलीत व अठ्ठेगाव पुठ्यात शांतता राखण्यासाठी स्वतः डीवायएसपी आयोजित धाराशिवकर हे लक्ष ठेवून आहेत.
★दोघांवर 307 गुन्हा दाखल
पाटोदा तालुक्यातील चिखली येथील गोळीबार प्रकरणी स्वरक्षणासाठी गोळीबार केला असून समोरील व्यक्तीचा हल्ला परतून लावण्यासाठी फायरिंग केली यामुळे दोघांवरही 307 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले असून त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला आहे.
★किरकोळ वादासाठी गोळीबार ; मग शस्त्र परवाना योग्य का अयोग्य!
एका लग्न समारंभात किरकोळ वाद झाला आणि तो वाद मिटवण्यासाठी बैठक बसली ती बैठक इतकी विकोपाला गेली की शेवटी गोळीबार झाला. तुमच्या किरकोळ वादामध्ये सुद्धा गोळीबार होत असेल तर परवाना योग्य आहे का अयोग्य ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.