एकच मिशन ओबीसीतून मराठा आरक्षण #सगेसोयरे
★किल्लेधारूर मध्ये होणाऱ्या संवाद बैठकीस उपस्थित रहा – सुरेश शेळके, अजित शिनगारे
किल्लेधरूर | प्रतिनिधी
मराठ्यांचा क्रांतीसुर्य संघर्ष योद्धा मनोज जंगी पाटील यांची ऐतिहासिक किल्ले धारूर नगरीमध्ये संवाद बैठक गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी संवाद बैठकीचा आयोजन केले आहे. दुपारी एक वाजता गरड मंगल कार्यालय किल्ले धारूर येथे मराठ्यांची संवाद साधणार आहेत. किल्ले धारूर नगरीतील व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके व अजित दादा शिनगारे यांनी केले आहे.
एकच मिशन मराठा ओबीसीतून मराठा आरक्षण सगेसोयरे या महत्त्वाच्या विषयावर सकल मराठा समाज ऐतिहासिक किल्लेधारूरच्या सकल मराठा समाजाशी हितगुज करण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 14 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता गरड मंगल कार्यालय येथे येत असून तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघर्ष योद्धाचे हात बळकट करावेत असे आव्हान राजमुद्रा सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सुरेश बप्पा शेळके व अजितदादा शिनगारे यांनी केले आहे.
★ऐतिहासिक किल्लेधारूर नगरीत पाटलांच्या स्वागताची जोरदार तयारी
14 मार्च रोजी ऐतिहासिक किल्ले धारूर नागरी मध्ये संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची दुपारी एक वाजता गरड मंगल कार्यालय किल्ले धारूर येथे संवाद बैठक होणार आहे या निमित्ताने ऐतिहासिक किल्लेधारूर नगरी पाटलांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.