★32 विद्यार्थ्यांना हॉस्टेल म्हणून चक्क मंगल कार्यालयात रवानगी!
जामखेड | प्रतिनिधी
डॉ. भास्कर मोरेच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन काॅलेजच्या पिळवणूकीच्या संबंधित गेल्या सहा दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान चे उपोषण सुरू आहे. याच अनुषंगाने नाशिक व रायगड विद्यापीठाने केलेल्या तपासणीत चक्क मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींना रहाण्यासाठी होस्टेल म्हणून मंगल कार्यालयात ठेवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या संस्थेत कीती सावळा गोंधळ सुरु आहे हे लक्षात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या नुसार काल दि ९ मार्च रोजी रत्नदीप मेडिकल कॉलेज व नर्सिंग होम साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जि .रायगडचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नासिकचे कमिटी सदस्य यांना रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या तपासणी मध्ये आनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच या ठिकाणी धक्कादायक बाब म्हणजे समितीला नर्सिंग कॉलेज देखील आढळून आले नाही. समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजची तपासणी केली या मध्ये आनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. तसेच समिती कॉलेज तपासणीसाठी आली असता संस्थेच्या आडमुठेपणा मुळे चक्क चौकशी समितीला दोन तास कॉलेजच्या पायर्यांवर बसावे लागले. कॉलेज तपासणी झाल्यानंतर सदरची समिती ही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींचे हॉस्टेल तपासणी करण्यासाठी गेल्यावर मात्र या समितीला धक्कादायक प्रकार पहावयास मिळाला चक्क रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याने उद्याचे डॉक्टरकीचे स्वप्न पहाणार्या (BAMS) च्या ३२ विद्यार्थींना होस्टेल म्हणून चक्क मंगल कार्यालयात रहाण्यासाठी ठेवले होते. मंगल कार्यालयात या विद्यार्थांची रहाण्याची सोय करुन लाखो रुपये होस्टेलच्या नावाखाली विद्यार्थीन कडुन घेतले होते. या ठिकाणी कसलीही पिण्याच्या पाण्याची, आंघोळीची व शौचालयाची स्वतंत्र सोय केलेली आढळून आली नाही. तसेच विद्यार्थींच्या पिण्याच्या पाण्याची सोय देखील याठिकाणी केलेली आढळून आली नाही. याबाबत तरी चौकशी समिती आता या संस्थेच्या चालकासह कॉलेजवर कारवाई करणार का हे पहावे लागणार आहे.
★लग्न आलेकी विद्यार्थींचे बिर्हाड बाहेर
लग्न आलेकी विद्यार्थींचे बिर्हाड बाहेर, लग्नाचे वर्हाड आत रत्नदीप मेडिकल फौंडेशन कॉलेजच्या (BAMS) च्या ३२ विद्यार्थींना चक्क होस्टेल म्हणून तीन महिन्यापासून मंगल कार्यालयात ठेवण्यात आले होते. या बाबत डॉ.भास्कर मोरे याच्याकडे विद्यार्थींनी चांगले होस्टेल देण्यासाठी अर्ज केला तर तो अर्ज फाडून टाकला जायचा. तसेच या मंगल कार्यालयास लग्नाची तारीख आली की मंगल कार्यालयात रहाणार्या विद्यार्थींचे बिर्हाड बाहेर काढले जायचे तर लग्नासाठी लग्नाचे वर्हाड आत घेतले जायचे.
★6 लॅबच्या रुम सील करून अव्हाल पाठवला
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर या कॉलेजची आतापर्यंत तीन कमिटीच्या वतीने तपासणी करण्यात आली असून यापैकी पुणे येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या वतीने 6 लॅबच्या रुम सील करून अव्हाल पाठवला आहे तसेच रायगड व नासीक च्या कमीटी नी तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत तसा अव्हाल पाठविण्यात येणार असल्याचे सर्व अधिकाऱ्यानी अदोलन कर्त्यांशी सांगितले आहे.
★पांडुराजे भोसले बसले अमर उपोषणास
सलग सहा दिवसापासून शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे अमर उपोषणास बसले आहेत त्यांची प्रकृती खालावली असून ते उपचार घेण्यास नकार दिला होता परंतु सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आग्रह केल्याने उपोषण करते यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास तयारी दर्शवली त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना सलाईन व पुढील उपचार करून ते उपोषण स्थळी बसले आहेत. या अंदोलनास शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, मनसे, आर पी आय, भा ज पा, रा कॉ कॉंग्रेस शरद पवार गट, वकील संघ, रा कॉ पक्ष अजित पवार गट, रा स पा, सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ मित्र मंडळाच्या वतीने व जामखेड तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी एक मुखी जाहीर पाठिंबा देऊन या घटनेचा जाहीर निषेध केला आणि तिव्र भावना व्यक्त केल्या.