★आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
पाटोदा | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये अनेक युवकांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या मध्ये गणेश मळेकर ग्रामपंचायत सदस्य नाळवंडी, बाजीराव शिंदे उपसरपंच डोमरी, प्रवीण तांबे ग्रामपंचायत सदस्य जाधववाडी यांना पाटोदा तालुक्याच्या युवकच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून युवकांचा संघटन अधिक बळकट करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांच्या मान्यतेने गणेश मळेकर ग्रामपंचायत सदस्य नाळवंडी, प्रवीण तांबे ग्रामपंचायत सदस्य जाधववाडी, बाजीराव शिंदे उपसरपंच डोमरी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पाटोदा उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले असून येणाऱ्या काळात आदरणीय अजितदादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भर टाकावी याकरिता यांना जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पाटोदा तालुका अध्यक्ष युवराज झुनगुरे पाटील यांनी म्हटले आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी अनेक पदाधिकारी नेतेमंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.
★पाटोद्यात काकांच्या पाठीशी युवकांची ताकद खंबीर उभा करू – युवराज झुनगुरे
आष्टी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सर्वसामान्य जनतेच्या युवकांच्या मनावर आधीच नाव कोरले आहे परंतु येणाऱ्या काळात युवकांचे संघटन मजबूत करून आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या पाठीशी युवकांची ताकद अधिक मोठ्या प्रमाणात उभी करू..
– युवराज झुनगुरे पाटील
अध्यक्ष – युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा.