★त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश खोटे यांचे कार्य कौतुकास्पद
आष्टी | प्रतिनिधी
- राज्यातील सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतात, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जय जवान जय किसान सर्वांनी एकत्र होऊन संघटना वाढवली पाहिजे. राज्यातील सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतात, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एक होऊन संघटना वाढवली पाहिजे, शेतकरी संघटनेपुढे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपले सरकार राज्यात असणे गरजेचे आहे. शेतकरी व सैनिकांनी संघटित होऊन शेतकरी संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन भारतीय जवान किसानचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशेयांनी केले.आष्टी येथे त्रिदल सैनिक सेवा संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या मालाला निर्यात बंदी अन व्यापाऱ्यांना निर्यात बंदीची मात्र सूट दिली जाते, त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधात असून व्यापारी धार्जिने सरकार असल्याने शेतकऱ्यांची पार वाट लावण्याचे काम करत आहेत, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आष्टी येथे छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या शुभहस्ते त्रिदल सैनिक सेवा संघाच्या मुख्य कार्यालयचे उदघाटन करण्यात आले.त्यानंतर आजी माजी सैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साहित्य रत्न अण्णासाहेब साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,म. जोतिबा फुले चौक, महावीर चौकातून बाईक रॅली काढण्यात आली नंतर मोरेश्वर मंगल कार्यालयात प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी की जय, जय जवान,जय किसान चा जयघोष करण्यात आला.यावेळी वीरमाता मंदाबाई सुंदर सोनवणे यांचा सत्कार भारतीय किसान पार्टीचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे, त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अंकुश खोटे यांनी केला तर. यावेळी चिमुकल्यांच्या देशभक्तीवर प्रभावी भाषण व एकच राजा इथं जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, बेटी हिंदुस्तान की, उदे गे अंबे उदे, जलवा, लावणी अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकून घेतले, मेळाव्यास भारतीय जवान किसान चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे, त्रिदल कोरकमिटी अध्यक्ष मा अशोक चौधरी,मा.महादेव बांगर, मा.प्रवीण कदम, मा.परशुराम शिंदे,मा.दिनकर पवार,मा.रहीम खाटीक मा, शिवप्रसाद माळवदे,मा विश्वनाथ ठोंबरे, भारत गीते मा राम तांबे, मा संजीव फसले , मा.हरिदास शिंदे, मा.बजरंग डोके, मा.संजय म्हस्के, मा.रावसाहेब शिंदे,मा.मधुकर साळवे, मा. बळीराम डोंगरे, मा.शेख साहेब, १९७१ भारत- पाक युद्धातील महान योध्दा मा. विश्वनाथ नेटके यांच्यासह आजी माजी सैनिकांच्या माता, भगिनी,पत्नी व सैनिक उपस्थित होते.देशात फक्त दोनच देशभक्त बाकी सगळे चोर आहेत असे परखड मत शिवाजी नांदखिळे यांनी व्यक्त केले कारण तिकडे माझ्या शेतकऱ्यांचा मुलगा सैनिक म्हणून देशाचे संरक्षण करतो तर इकडं आमचा शेतकरी बाप मात्र अन्न पिकवून पोटाची भूक भागवितो म्हणून हेच खरे देशभक्त आहेत असे शिवाजी नांदखिळे म्हणाले. तर भारतीय जवान किसान राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, ७६ वर्षांत प्रथम बाप आणि मुलगा एकत्र आला आहे आता राज्यात व देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही , देशात अजून दररोज निर्भया सारख्या घटना घडत असून हे बंद करावयाची वेळ आता आपल्यावर आली आहे २०२४ मध्ये जय जवान जय किसान चे सरकार आल्यावर हिंमत असेल तर एखाद्या महिला भगिनीवर अन्याय अत्याचार करून दाखवाच मग कळेल जय जवान जय किसान शासन काय आहे?असे खुले अवाहन यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आष्टी शहराध्यक्ष माने यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन मधुकर गळगटे यांनी केले तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अंकुश खोटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आष्टी तालुका अध्यक्ष नवनाथ भगत, धामणगाव गटप्रमुख संजय गायकवाड कोशाध्यक्ष कैलास पाखरे सहसचिव बबन दहिफळे डायरेक्टर मनीष नरोडे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव काकडे, दौलावडगाव गटप्रमुख दादासाहेब ठोंबरे, लोणी गटप्रमुख विष्णू पवार, ह.आष्टा गटप्रमुख परसराम पठाडे, जनार्धन धनवडे, सचिव हनुमान झगडे, कडा गटप्रमुख आजिनाथ खिळे यांनी खूप सहकार्य केले.