सौताडा येथे शिवजयंती निमित्त ” शिवजयंती चषक ” क्रिकेट स्पर्धा संपन्न
पाटोदा | प्रतिनिधी
युगपुरूष छञपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सौताडा येथे दरवर्षी मोठा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतो. सात दिवस वेगवेगळ्या सामाजिक, प्रबोधनिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.त्याच जोडिला यावर्षी 19 फेब्रुवारी दिवसी भव्य खुल्या टेनिस बाॕल क्रिकेट स्पर्धांचं. आयोजन केलेलं होतं. त्यानुसार 19 फेब्रुवारी शिवजयंती दिवसी या स्पर्धेचं शिवजयंती चषक 2024 चं ऊद्घाटन केलं गेलं व पुढील 6 दिवस या क्रिकेट स्पर्धा चालल्या.6 दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धांमध्ये पंचक्रोशितील अनेक नामवंत संघांनी सामने खेळले.यामध्ये सोमेश्वर क्रिकेट क्लब पिंपळवंडी,आर.आर बाॕईज मुगगाव,रामेश्वर क्रिकेट क्लब सौताडा,गेमचेजंर जामखेड अशा अनेक संघांनी सहभाग नोंदवला.रामेश्वर दरीच्या वरच्या बाजुला आसलेल्या भव्य मैदानावर या स्पर्धा भरवण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये प्रभम पारितोषिक आर.आर.बाॕईज मुगगाव या संघानं ऊत्कृष्ट कामागिरी करत पटकावलं तर द्वितीय पारितोषिक शिवप्रेमी क्रिकेट क्लब सौताडा नं पटकावलं तर तृतीय पारितोषिक देखिल संघानं मिळवलं यामध्ये मॕन आॕफ द सिरीज हा किताब आर.आर बाॕईजच्या तुषार खवळे या ऊत्कृष्ट खेळाडूनं पटकावला.प्रथम पारितोषिक सौताडा गावचे सरपंच मा.महादेवजी (बाप्पू) घुले यांच्याकडून रोख रक्कम 25 हजार तर द्वितिय पारितोषिक ज्येष्ठ नेते मा.भाऊसाहेब आण्णा भवर यांच्याकडून रोख रक्कम 21 हजार तर तृतिय पारितोषिक सौताडा गावचे ऊपसरपंच मा.आण्णासाहेबजी शिंदे यांच्याकडून देण्यात आले होते.शिवजयंतीनिमित्त भरवलेली ही स्पर्धा ऊत्कृष्टरित्या पार पडली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौताडा गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे , अक्षय पेचे, अविराज शिंदे, सलमान पठाण, राम शिंदे, वैभव पुलावळे, हनुमंत खंडागळे, रामदूत भैय्या सानप, योगिराज शिंदे, लक्ष्मण शिंदे, सागर टेकाळे, सुखदेव ऊबाळे, रामचंद्र शिंदे, सांगळे, दरे आदिंनी परिश्रम घेतले.