19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

कुणी फुंकावी तुतारी!

कुणी फुंकावी तुतारी!

कुणी फुंकावी तुतारी
कुणी घड्याळ बघावे..
कुणी घ्यावे मसाला हाती
कुणी धनुष्यबाण ताणावे..

कुणी मुतावे धरणात
कुणी धरण गिळावे..
कुणी सत्तेसाठी आपले
इनाम गिरवी ठेवावे…

कुणी काका साठी झुरले
कुणी पुतण्याला बाजूला केले..
सत्तेसाठी ज्यांनी त्यांनी
आपले प्यादे सरकवले..

कोणी पोरीला पुढे केले
कुणी पोरगा डावी लावला..
कुणी घराणेशाहीसाठी
पक्ष डावावर लावला..

कुणी कमळ फुलवावे
कुणी हाती कमळ घ्यावे..
कुणी ईडीच्या भीतीने
स्वतःला गिरवी ठेवावे..

महाराष्ट्र देशा आता
मतदार मूर्खात निघाले..
सत्तेसाठी सगळ्यांनी आपले
कमरेचे डोक्याला गुंडाळले…

कुणी तुतारी मिळवताच
दर्शना रायगडी पोहोचले…
हाती घड्याळ असता
कुणी कमळ कुरवाळले..

बस करा आता तुम्ही
महाराष्ट्र डोक्यावर लावणे..
हाकलून लावा सत्तेवरूनी
आता हे सगळे शहाणे..

ताठ मानेने उभी राहू दे
पुन्हा छान महाराष्ट्राची..
दाखवा जागा महाभागांना
अन् ताकत मतदारांची…!

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!