★छत्रपती चषक ही क्रिकेट स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी व शिक्षकांसाठी एक पर्वणीच!
सावरगांव घाट | आरिफ शेख
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गटशिक्षणाधिकारी कार्यालय पाटोदा व लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित पाटोदाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा परिषद शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेचा छत्रपती चषक केंद्रीय प्राथमिक शाळा वहालीच्या संघाने पटकावला. चाऊस मैदान, पाटोदा येथे खेळल्या गेलेल्या या चुरशीच्या सामान्यात केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडीच्या संघाला नमवत छत्रपती चषकावर आपलं नाव कोरल.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये सर्व केंद्रांच्या बारा संघांनी सहभाग नोंदवला. छत्रपती चषक ही क्रिकेट स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी व शिक्षकांसाठी एक पर्वणीच ठरली.हसत खेळत खिलाडूवृत्ती जोपासत अविस्मरणीय खेळाचा आनंद शिक्षकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून लुटला. कैलास पिकवणे साहेब गटशिक्षणाधिकारी व हनुमंत गव्हाणे साहेब शिक्षणविस्तार अधिकारी यांच्या नियोजनानुसार ही स्पर्धा स़पन्न झाली.आदरणीय बन साहेब,कोठूळेसाहेब, तहसीलदार पाटोदा,हनुमंत गव्हाणे शिक्षणविस्तार अधिकारी, लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित पाटोदाचे अध्यक्ष उद्धव राख, उपाध्यक्ष, बाळासाहेब मुसळे,सचिव,पोपट साबळे, माजी अध्यक्ष रमेश नागरगोजे यांच्या हस्ते विजेता संघ व उपविजेता संघांना चषक देऊन गौरवण्यात आले तसेच मॅन ऑफ द सिरीज वहाली केंद्राचे अष्टपैलू खेळाडू अशोक विधाते, बेस्ट बाॅलर प्रविण उकांडे, बेस्ट बॅटस्मन संदीप सांळूके मॅन ऑफ द मॅच तावरे सर ,व जलद अर्धशतकवीर, रवींद्र कळसाने, यांना देण्यात आला.
या प्रसंगी संचालक राजेंद्र गोरे, दिलीप खाडे,परशुराम सोंडगे,प्रवीण काळूशे ,राजेश पवार, विजय नागरगोजे, पंढरीनाथ सोंडगे प्रकाश राख गजानन भोसले संदीप जावळे, संध्या-शिंदे टेकाळे,लिला पोकळे-तांबे.व माजी अध्यक्ष बापू मळेकर सर , अशोक पवार सर,जालिंदर बेंद्रे सर, वहाली केंद्र प्रमुख रंजित म्हस्के साहेब,दत्तात्रय गोसावी सर मुख्याध्यापक ,आश्रूंबा विघ्ने सर उपस्थित होते.या क्रिकेट स्पर्धेसाठी समालोचक म्हणून लक्ष्मण नजान सर व संदीप जावळे सर यांनी रंगत आणली.श्री.गुंडाले साहेब, कळसाने सर,अजय भराटे सर,विनोद पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.