★मराठ्यांसाठी सग्या सोयऱ्यांबाबतच्या आरक्षणाचा निकाल महत्त्वाचा
बीड | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले. ”हे आरक्षण आमच्यावर थोपवू नका. सरकार देतंय ते आरक्षण आम्हाला नको. मराठ्यांची शक्ती, दम बघायचया आहे का? आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला. प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. हरकती चा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही.
★सग्या सोयऱ्यांबाबत काय ?
निवडणूक आहे तो पर्यत टिकेल ,उद्या उडाले की बसा बोंबलत. आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही. सग्या सोयऱ्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी काम करू देत नाहीये.