धनराज पवार यांचा मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सत्कार!
जामखेड | प्रतिनिधी
Mass Communication & Journalism परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल युवा पत्रकार धनराज पवार यांचा मुस्लिम पंच कमिटी, जामखेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. युवा पत्रकार धनराज पवार हे नेहमीच तळागाळातील व
समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणारे जागरुक पत्रकार आहेत. तसेच त्यांनी Mass Communication & Journalism परिक्षेत उत्तीर्ण झाले असून ते अधिकृत पत्रकार आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे मत मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी यांनी मत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी,हाजी मंजूर सय्यद , मुख्तार सय्यद (टेलर) ,माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद,आबेद खान साहेब ,शेरखान भाई ,इम्रान कुरेशी ,फरमानभाई शेख,इस्माईल शेख ( टेलर),याकुब तांबोळी ,नय्युम भाई सुभेदार,परवेज खान,आसिफ शेख ,जावीद सय्यद (बारुद),जावीद बागवान,अर्शद शेख,नाजीम काझी,जाहेरभाई मिस्त्री,जाफर सय्यद,हाजी नादीर शेख आदी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.