शिक्षणासह, आरोग्यासाठी खेळही महत्त्वाचा – सत्यभामाताई बांगर
★मुलांच्या संघात कुसळंबचा तर मुलीत काळेगाव हवेलीचा संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी!
पाटोदा | प्रतिनिधी
कोरोना योद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 फेब्रुवारी रोजी हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळा येथे भव्य राज्यस्तरीय चौदा वर्षीय वयोगटातील मुले व मुली यांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डीसीसी संचालिका तथा भायाळा गावच्या सरपंच सौ.सत्यभामाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक जिल्ह्यातील संघ मोठ्या संख्येने सहभागी होऊन या स्पर्धेचे शोभा वाढवली होती.
हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांचा वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता मुले व मुलींचे सामने या ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगले तर प्रेक्षकांनी देखील मोठा आनंद घेतला यावेळी सौ सत्यभामाताई बांगर यांनी खेळाडूंना व प्रेक्षकांना संबोधित करताना शिक्षणासह आरोग्य बरोबर खेळालाही खूप मोठे महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या खेळाकडे वळले पाहिजे आणि खेळामध्ये आपलं कर्तुत्व सुद्धा सिद्ध केलं पाहिजे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो कबड्डी खेळातील वैभव गर्जे यांचे वडील भाऊसाहेब गर्जे हे देखील या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते त्यांचेही ताई साहेबांनी कौतुक केले. असेच स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी स्वतःला घडावे आणि विद्यालयाबरोबर आई वडिलांचे नाव देखील मोठे करावे अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज शाहूराव बांगर, संतोष सखाराम बांगर, रामदास गर्जे, बाबासाहेब बांगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी कर्मत्तर कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले होते यामध्ये नितीन गर्जे सर, भीमराव बांगर सर, प्रवीणकुमार जावळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन बांगर सर यांनी केले.
★हुतात्मा देवराव विद्यालयातून अनेक खेळाडू घडले आणि घडतील!
हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून अनेक विद्यार्थी खेळामध्ये घडले आहेत स्वतःचं, पालकांचे, विद्यालयाचे नाव गाजवत आहेत येणाऱ्या काळात देखील हुतात्मा देवराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून खेळामध्ये आपलं नाव उंचावतील आणि शाळेचे देखील नाव उंचावतीन असंच कार्य खेळाडू करतील अशा देखील अपेक्षा सर्व पालक शिक्षक वर्गातून होत आहेत.
★मुलांचे विजय संघ
1) अण्णा हेल्थ क्लब कुसळंब प्रथम क्रमांकाचा मानकरी
2) शिवनेरी क्रीडा मंडळ भूम चा संघ ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी
3) कमळेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी
★मुलींचे विजय संघ
1) विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव हवेली प्रथम क्रमांकाचे मानकरी
2) हुतात्मा देवरा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळा द्वितीय क्रमांकाचे मानकरी
3) आदर्श क्रीडा मंडळ चऱ्हाटा तृतीय क्रमांकाचे मानकरी