श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, भगवान भक्तीगडावर दरवर्षी सप्ताहासाठी दिली जाते साखर!
★अंमळनेर सर्कल मध्ये सर्व धार्मिक स्थळावर भाऊसाहेब भवर यांच्याकडून महाप्रसादासाठी साखरेचा यज्ञ!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा सुरेश आण्णा धस यांचे समर्थक भाऊसाहेब अण्णा भवर यांचा अमळनेर सर्कल मधील सर्व धार्मिक स्थळावर अन्नदानाचा महायज्ञ सुरू आहे यावर्षी देखील भगवान भक्ती गड व श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर सप्ताहासाठी साखर पोहोच करण्यात आली यावेळी अंमळनेर सर्कल मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमळनेर सर्कल मधील सर्व धार्मिक स्थळावर सप्ताहासाठी ला जाणारा महाप्रसाद त्यामध्ये खारीचा वाटा भाऊसाहेब अण्णा भवर यांचा नेहमीच राहिला आहे यावर्षी देखील ज्या ज्या ठिकाणी सप्ताह सुरू होते त्या त्या ठिकाणी साखर पोहच करण्यात आली असून नुकतीच सावरगाव येथे सप्ताहासाठी साखर वच केली असून गहीनाथ गडाच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी साखर पोहोच करून आपला महायुद्ध सुरूच ठेवला आहे. त्यांच्या वर अन्नदानाच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव जिल्हा भरामधून होत आहे. सुरेश आण्णा धस यांनी सामाजिक कार्याची जोड देऊन राजकारण करण्याचा सल्ला दिल्याने त्यांची कार्यकर्ते देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धार्मिक क्षेत्रांमध्ये आपलं कार्य करताना दिसत आहे भाऊसाहेब अण्णा भवर यांनी सामाजिक क्षेत्राबरोबर धार्मिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आपलं कार्य अधिक झपाट्यांन सुरू ठेवले आहे.