भाऊसाहेब आण्णा भवर यांच्याकडून ” आण्णा पर्व उत्सव ” च्या दुसऱ्या पर्वाची तयारी पूर्ण!
★नमो चषक 2024 भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान अमळनेर सर्कल मुगगाव मध्ये तयारी पूर्ण!
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्राचे राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दोन फेब्रुवारी रोजी मुगाव येथे भाजपचे नेते भाऊसाहेब भवर यांच्या आयोजनातून भव्य दिव्य ” आण्णा पूर्व उत्सव ” गेल्या वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यावर्षी देखील जयत तयारी केली असून जवळपास 22 लाखाच्या कुस्त्यांची दंगल पाहायला मिळणार आहे.
अण्णा पर्व उत्सव चा दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाची तयारी जोरदार झाली असून 2 फेब्रुवारी रोजी मुगगाव येथे अंमळनेर सर्कल मधील हजारो नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रमेशजी आडसकर साहेब यांची विशेष उपस्थिती असणार आहे. विशेष सहकार्य पैलवान रामचंद्र दादा धस तालीम व पैलवान राहुल दादा जगदाळे मित्र परिवार आष्टी यांचे लाभणार आहे. अण्णा पर्व उत्सव कार्यक्रम मुगगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आला असून शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर, भारतीय जनता पार्टी, आमदार सुरेश आण्णा धस मित्र मंडळ अंमळनेर सर्कलच्या वतीने देण्यात आली आहे.
★22 लाखाच्या कुस्त्यांची दंगल!
आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अण्णा भवर आयोजित अण्णा पर्व उत्सव 2024 वर्ष दुसरे मोठ्या उत्साहात जयंती तयारी पूर्ण झाली असून यावर्षी 22 लाखाच्या कुस्त्यांची दंगल आपल्याला मुगगाव मध्ये पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी पै.सोनु कुमार ही कुस्ती पाहायला मिळणार आहे.
★नमो चषक 2024 आयोजित भव्य जंगी कुस्त्याचे मैदान
नमो चषक 2024 व आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आण्णा पर्व उत्सव मुगगाव 2024 आयोजित भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान पाहायला मिळणार आहे. भाजपचे नेते भाऊसाहेब अण्णा भवर यांच्याकडून दरवर्षी ” अण्णा पर्व उत्सव ” मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील मुगाव येथे अण्णा पर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून बारा लाखाच्या कुस्त्यांची दंगल पाहायला मिळणार असून विविध उपक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
★आमच्यासाठी आण्णाच सर्वस्व! – भाऊसाहेब भवर
महाराष्ट्र राज्याचे मा.महसूल मंत्री सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षापासून अण्णा पर्व उत्सव साजरा केला जात आहे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात अण्णा पर्व उत्सव साजरा करण्यासाठी जयत तयारी केली असून आमच्यासाठी अण्णा सर्वस्व असल्याने जे अण्णाच्या संकल्पनेतील अन्नाच्या मनातील आणि जनतेच्या हक्काचे कार्यक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा करत आहोत. जनतेला आणि आण्णा ला देखील अभिमान वाटेल असेच कार्य आमच्या हातून यापुढे देखील होत राहील.
– मा.भाऊसाहेब आण्णा भवर
ज्येष्ठ नेते भाजपा.