राज्य सरकारकडून दिव्यांग व्यक्तींची चेष्टा – जिलानी शेख
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शिंदे सरकारने दिव्यांग व्यक्तीना ई रीक्षा साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ३डीसेबंर २०२३ ते ८जानेवारी २०२४ पर्यत मुदत दिली या कालावधीत ४५ हजार ३९० दिव्यांग व्यक्तीने ऑनलाईन अर्ज केले मात्र राज्य सरकारने ६६७ लाभार्थीना ई -रीक्षा मंजुर केला आहे ही दिव्यांग व्यक्तीची चेष्ठा नाही तर काय आहे शिंदे सरकारने दिव्यांग व्यक्तीचे वाईट अर्शिवाद घेऊ नयेत पुन्हा विचार करून सदर योग्य लाभार्थी यांना न्याय दयावा असे प्रसिध्दी पत्रकात दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष शेख जीलानी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तीची १ कोटी संख्या आहे याचे सर्वे करण्यात यावा, दिव्यांग व्यक्तीची हेंडसाळ थांबवावी बोगस दिव्यांग व्यक्तीची चौकशी करून कारवाई करावी राज्य सरकारने गोरगरीब दिव्यांग व्यक्तीना ई – रीक्षा या योजनेचा लाभ द्यावा जेणेकरून त्यांचे उपजिवेकेचा प्रश्न मिटेल व त्यांना मुख्य प्रवाहत येण्यास मदत होईल राज्यसरकार दिव्यांगासाठी नुसते घोषणा करते पण अमंलबजावणी करत नाही ही बाब गंभीर आहे असे प्रसिध्दी पत्रकात दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जीलानी शेख , अशोक दगडखैर, संतोषकुमार राख , निकेश सरोदे, बाळू गर्जे, सय्यद मतीन, बजरंग लांडगे , ईश्वर आमटे , हनुमंत काळूशे सह दिव्यांग बांधवानी म्हटले आहे.