★प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अंमळनेर -निवडुंगा रस्त्याचा भूमिपूजन सोहळा
कुसळंब | प्रतिनिधी
अंमळनेरवरुन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाकडे जाणारा अंमळनेर ते निवडुंगा रस्त्याचा भुमिपुजन सोहळा बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते आणि बीड -लातुर-उस्मानाबाद जिल्हयाचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता निवडुंगा येथे संपन्न होत असुन या भुमिपुजन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन भाजपचे जेष्ठ नेते तथा अंमळनेर सर्कलचे नेते भाऊसाहेब आण्णा भवर यांनी केले आहे.
आठ्ठेगावपुठ्ठा परिसर अंमळनेरला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणून निवडुंगा- अंमळनेर हा रस्ता समजला जातो. मुगगाव, वहाली, सावरगाव,अंतापुर,चिखली,चिंचोली ,निवडुंगा आदी गावाला अंमळनेरला येण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु सदरील रस्ता अत्यंत दयनीय झाल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांची दमछाक होत आहे. हा रस्ता व्हावा यासाठी आ.सुरेश धस यांचेकडे अंमळनेच्या व्यापारी आणि शेतकर्यांनी वेळोवेळी हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. अनेकदा मागणी केली होती. हा रस्ता व्हावा यासाठी आ.सुरेश धस यांनी वरिष्ठ पातळीवर खा.प्रितमताई मुंडे यांचेकडे पाठपुरावा केला. अखेर या रस्त्याला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूरी मिळाली असुन प्रत्यक्षात आज या कामाचे भुमिपुजन होत असल्याने अंमळनेर आणि आठ्ठेगावपुठ्ठा परिसरातील शेतकर्यांनी खा.प्रतिमाताई मुंडे आणि आ.सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.अंमळनेर -निवडुंगा या जिव्हाळ्याच्या रस्ता प्रश्नाची सोडवणुक होत असुन यामुळे अंमळनेच्या बाजारपेठेला चांगले दिवस येणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता होत असल्याने निश्तितच दर्जेदार होणार आहे.या भुमिपुजन सोहळ्याला अंमळनेर आणि आठ्ठेगाव पुठ्ठा पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन अंमळनेर ,सर्कलचे भाजपाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब (आण्णा) भवर यांनी केले आहे.