संजीवनी फाउंडेशनचा पत्रकारितेतील लेखणीचा सन्मान सचिन पवार यांना जाहीर
★संगमनेर येथे होणार शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम
पाटोदा | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित दरवर्षी शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे आयोजन केले जाते यंदाच्या 2024 पुरस्कारासाठी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्राध्यापक सचिन पवार यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच कामगिरी आणि गुणी जन यांना दरवर्षी प्रदान करण्याची परंपरा आहे यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील कुसळंब चे रहिवासी प्राध्यापक सचिन पवार यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे वितरण पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्राध्यापक सचिन पवार यांना येत्या काही दिवसात प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांनी पाठवले आहे. या पुरस्काराबद्दल प्राध्यापक सचिन पवार यांचे राजकीय सामाजिक वैचारिक पत्रकारिता क्षेत्र सह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
★पत्रकारितेतील लेखणीचा सन्मान
प्राध्यापक सचिन पवार यांनी गेल्या अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत खडतर पणे लेखणी चालवली आहे. राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक सांस्कृतिक शैक्षणिक आधीसह विविध क्षेत्रातील समस्यांवर त्यांनी लिखाण केले आहे. या सर्व बाबींची दखल घेत संजीवनी फाउंडेशन चा जाहीर झालेला पुरस्कार लेखणीचा सन्मान आहे.