पडद्यामागील मराठा सेवक किशोर पिंगळे फोटोग्राफरने हेरला!
★पाच कोटी मराठे पाहतायत आपल्यासाठी झडतय कोण ?
बीड | सचिन पवार
अंतरवाली सराटी येथून सर्वसाधारण घरातील शेतकऱ्याच्या फाटक्या पोरानं म्हणजेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठ्यांसाठीच्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून सावलीप्रमाणे बीड येथील मराठासेवक किशोर आप्पा पिंगळे यांनी स्वतःच घरदार पक्ष संघटना मित्रपरिवार बाजूला ठेवत मराठ्यांचा भविष्यासाठी पायात भिंगरी सारखं लढणाऱ्या योद्धा ला साथ देण्यासाठी आपणही पुढे आलं पाहिजे याच हेतून किशोर आप्पा पिंगळे यांनी सावलीप्रमाणे आणि पडद्यामागची भूमिका घेऊन खंबीरपणे पार पाडली त्यांच्यावर कोणाचे ना कुणाची नजर पडणारच होती आणि ती बीड येथील इशारा सभेमध्ये फोटोग्राफरची पडली आणि त्यांनी नकळत त्यांचं काढलेले छायाचित्र हे महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांच्या मनाला मनमोहक ठरले आहे.
महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांचा काळीज म्हणजेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण टाकण्यासाठी उभारलेला संघर्ष अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे त्यांना महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांनी सुद्धा खंबीरपणे साथ दिली आहे. पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या पाठीशी पडद्यामागे राहून सावलीप्रमाणे आपली भूमिका चौख पार पाडणारे मराठा सेवक किशोर आप्पा पिंगळे हे सुद्धा सर्वांच्या काळजात घर करून बसले आहेत. सामाजिक कार्यातून युवकांच संघटन करून आपली ओळख आधीच सर्वांसाठी हाकेला धावून जाणार सरकार म्हणून किशोर पिंगळे यांची ओळख होती आता मराठ्यांच्या काळजामध्ये घर करणार नाव किशोर पिंगळे हे ठरले आहे. त्यांचं काम आणि कार्य आणि लोकांबद्दलची असलेली आपुलकी ही न विसरता येणारी आहे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किशोर पिंगळे यांचं नाव हक्काने आणि आदराने घेतलं जात. त्यांच्या पडद्यामागच्या भूमिकेवर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
★MH 23 अन् किशोर पिंगळे; पाच कोटी मराठ्यांनी पाहिलं!
मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अति महत्त्वाचा करत मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण टाकण्याचा विडा उचलला आणि पायात भिंगरी घालून महाराष्ट्र दौरा सुरू केला त्याच पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बीड येथील MH-23 अन् मराठा सेवाक किशोर पिंगळे यांनी सुद्धा आपल्या सर्व राजकीय सामाजिक आणि घरातील कामांना पूर्णविराम दिला आणि मराठ्यांसाठी मनोज जरांगे यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे पडद्यामागे राहून आपली भूमिका पार पाडली ती महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांनी पाहिली आहे.