★आई वडील देव रुपात; श्रद्धेमुळे ऊर्जा आणि शक्ती प्राप्त
बीड | प्रतिनिधी
समता, बंधुत्व आणि एकतेच्या शिकवणी बरोबरच सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची रुजवण संत सज्जनांनी केली. अशा या विविध थोर राष्ट्रसंतांच्या विचारसरणीवर श्रद्धा ठेवून आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याची परंपरा जपणाऱ्या किंबहुना राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करतानाच अध्यात्म सेवा घडवण्यात धन्यता मानणारे रुपेश बेद्रे पाटील यांच्या धार्मिक वृत्तीचे कौतुक होत आहे.
आपल्या धर्म आणि परंपरांचा अभिमान बाळगला पाहिजे, ही भूमिका घेत शांत समाधानी आणि अध्यात्माची दिशा देणाऱ्या ग्रंथांचे वाचन त्यांनी केले आहे. अंधश्रद्धा रूढी परंपरांना तिलांजली देत आपल्या वाणीचा वापर समाज प्रबोधनासाठी व्हावा..या हेतूने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकारणातील अनेक सभा त्यांनी गाजवल्या. वक्तृत्वाची देण मुळातच लाभलेल्या रुपेश बेद्रे पाटील यांनी आपल्या मातोश्रींच्या सेवापूर्ती समारंभातून सर्व क्षेत्रातील गुणी जणांना निमंत्रित करून केलेली सेवा कौतुकास्पद ठरली आहे.ग्रा.पं ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदापर्यंत मजल मारून एका सामान्य खेड्यातील युवकाची ही झेप ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणास्थानी आहे. राजकारण करतानाच त्यांनी अत्यंत परिश्रमातून उद्योग व्यवसाय क्षेत्रातही पुण्यासारख्या ठिकाणी स्थान निर्माण केले आहे. कोरोना सारख्या संकटात ही रस्त्यावर उतरून त्यांनी गरिबांना आधार देण्यात खारीचा वाटा उचलला आहे.या सर्व यशाचे श्रेय ते आपल्या आई-वडिलांना देतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मातोश्री आणि वडील यांना देशभरातील धार्मिक स्थळांना नतमस्तक करून सेवा धर्म पाळला आहे.स्वतः रुपेश बेदरे पाटील हे तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीवर नितांत श्रद्धा ठेवून असतात. सतत नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत ते आपल्या जीवनाची वाटचाल करतात.वडील साहेबराव बेद्रे पाटील आणि आई जयश्रीताई तसेच सौभाग्यवती यांना सोबत घेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.