जाटनांदुरची अवस्था म्हणजे चार गावचा पाहुणा तरीही उपाशी
★पुढार्यांनो जाटनांदुरकरांसाठी लक्ष घाला अन्यथा पुढील परिणामाला सामोरे जा – मराठासेवक डॉ.भागवत जेधे
पाटोदा | सचिन पवार
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील अनेक गावांचे रेकॉर्ड कुठेच सापडायला तयार नाहीत त्यातीलच शिरूर तालुक्यातील जाटनांदुर गाव एक आहे. जाटनांदुर गावची अवस्था म्हणजे चार गावचा पाहुणा तरीही उपाशी अशी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच जात नांदूर गावची युवक आघाडीवर राहिले आहेत परंतु त्याच गावाच्या युवकांना त्यांचे रेकॉर्ड कुठेच सापडायला तयार नाही आष्टी-पाटोदा-शिरूर-रायमोह-पाथर्डी पर्यंत धावपळ केली तरीही रेकॉर्ड कागदही सापडायला तयार नाही मग रेकॉर्ड गेलं कुठं असा प्रश्न उपस्थित करत आम्ही काय पाकिस्तानला जायचं का ? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
मराठा कुणबी प्रमाणपत्र नोंदीसाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिक धावपळ करत आहे 80 टक्के नोंदी देखील सापडले असून गावाची गावे कुणबी होताना दिसत आहेत मात्र शिरूर तालुक्यातील जाटनांदुर गावचे साध रेकॉर्ड सापडायला तयार नाही मग नोंदी कशा सापडणार असाही प्रश्न उपस्थित झाला असून गावातील युवक नागरिक आक्रमक होण्याच्या पवित्र्यात आहेत आमचं गावचे रेकॉर्ड आष्टी-पाटोदा-शिरूर-रायमोह-पाथर्डी यापैकी कुठेच नाही मग आमचं रेकॉर्ड पाकिस्तानला ठेवले आहे का ? असा सवाल केला आहे. आमचं गाव इथेच आहे का का ? उचलून आणलं असाही सवाल उपस्थित होत आहे. आमच्या दोन्ही आमदार साहेबांना विनंती आहे की अधिकाऱ्यांना सांगून आमच्या रेकॉर्ड संदर्भात तात्काळ आदेश द्यावेत अन्यथा तुम्हाला गावात यायला विचार करावा लागेल असा इशारा ही जाटनांदूर येथील युवकांनी दिला आहे.
★आष्टी-पाटोदा-शिरूर तालुक्यात रेकॉर्ड नाही मग काय पाकिस्तान जायचं का ?
शिरूर तालुक्यातील जाटनांदुर गाव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहे परंतु त्याच गावातील नागरिकांचे रेकॉर्ड सापडायला तयार नाही. गावातील नागरिक युवक आक्रमक झाले असून आमचे रेकॉर्ड सापडत नसेल तर आम्ही पाकिस्तानला जाऊन सापडायचे का ? असा संतप्त सवाल सुद्धा ग्रामस्थांनी युवकांनी केला आहे.
★जाटनांदुरकरांची दोन्ही आमदाराकडे टाहो!
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघातील सर्व आमदारांना जाटनांदूरकरांची कळकळीची विनंती आमच्या गावाचं रेकॉर्ड जाणून-बुजून देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येत आहे. आमचे रेकॉर्ड जिथे असेल तिथून सापडून द्या अन्यथा आमच्या गावात येऊच नका असा कडक इशारा जाटनांदूर गावातील ग्रामस्थांकडून दिला जात आहे.