14.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

वर्ल्ड अबॅकस चॅम्पियनशिप करिता अनन्या काशिनाथ मोरे निवड

★सर्वोत्कृष्ट कांस्य पदक अनन्या काशिनाथ मोरेने मिळवले

बीड | प्रतिनिधी

शालेय जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शालेय तंत्रांचा वापर केला जातो त्यामधील अतिशय महत्त्वाचं गणितीय तंत्र म्हणजेच अबॅकस होय. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरीता अबॅकस आणि वैदिक गणित अतिशय महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. अबॅकस स्टडी सेंटर द्वारे अनेक विविध अबॅकस आणि वैदिक मॅथ लेव्हलच्या स्पर्धा घडवून आणून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी अबॅकस लेव्हल परीक्षेमध्ये विद्यार्थि अनन्या काशिनाथ मोरेने अबॅकस लेव्हलच्या सर्वोत्कृष्ट अबॅकस स्पर्धक म्हणून कांस्य पदक मिळवलेले आहे. शालेय अभ्यासक्रमातील, व्यवहारिक ज्ञानातील अनेक गणितीय प्रक्रिया काही क्षणांमध्ये अबॅकस द्वारे करू शकते तसेच आत्मविश्वास स्मरणशक्ती एकाग्रता वाढलेली आहे असे अनन्या काशिनाथ मोरे विचार व्यक्त केले आहे. अबॅकस लेव्हलच्या परीक्षेमध्ये अवघ्या सात मिनिटांमध्ये 60 प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलेली असून ज्यामध्ये त्याचा सर्वोत्कृष्ट स्पर्धक 84% मिळवून क्रमांक मिळवला आहे. वर्ल्ड अबॅकस चॅम्पियनशिप जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या अबॅकस चॅम्पियनशिपसाठी सुद्धा अनन्याची निवड करण्यात आलेली आहे. अनन्या मोरेच्या यशामध्ये आई-वडिलांचे अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. सतत अभ्यास करणे, दिलेले होमवर्क पूर्ण करणे अगदी सुरुवातीपासून त्याने सातत्य ठेवलेले आहे. अनन्या मोरेने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत , अभिनंदन, पुढील वर्ल्ड अबॅकस चॅम्पियनशिप परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत होत , असे जिल्हा अबॅकस वितरक एस ए घोडके यांनी सांगितले आहे.

★अबॅकस हे एक महत्त्वाचे माध्यम

विद्यार्थ्यांच्या मनातील गणिता विषयाची भीती दूर करण्यासाठी अबॅकस हे एक महत्त्वाचे माध्यम आहे’. असेही अनन्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!