आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील महसूल कर्मचारी निवासस्थाना करिता 36 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी – आ. बाळासाहेब आजबे
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाना करिता आपण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्या प्रस्तावावर माननीय मंत्री महोदय यांची स्वाक्षरी झाली असून आष्टी पाटोदा व शिरूर येथील महसूल कर्मचारी नविन निवासस्थाना करिता 36 कोटी 22 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची आवश्यकता असल्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडून करण्यात येत होती त्यानुसार आपण गेल्या वर्षभरापासून आष्टी पाटोदा व शिरूर या ठिकाणी महसूल कर्मचारी निवासस्थानाचा प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले होते त्यानुसार त्या सर्व प्रस्तावावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची स्वाक्षरी झाली असून आष्टी येथील महसूल कर्मचारी निवासनाकरिता 13 कोटी 19 लक्ष 80 हजार रुपये, पाटोदा महसूल कर्मचारी निवासस्थानाकरिता 14 कोटी 38 लाख 70 हजार व शिरूर कासार येथील महसूल कर्मचारी निवासस्थानाकरिता 08 कोटी 66 लाख रुपये च्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे लवकरच या कामाची प्रशासकीय मान्यता निघून कामांना सुरुवात होणार आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील महसूल कर्मचारी निवासस्थान या महत्त्वाच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब या सर्वांचे मतदार संघाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो यापुढेही अनेक प्रशासकीय इमारतीचे कामे प्रस्तावित असून त्यांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.