माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पाटोदा ता.कार्याध्यक्ष पदी जावेद शेख यांची निवड
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा येथील रहिवासी पत्रकार जावेद शेख यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पाटोदा ता.कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.जावेद शेख हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या हिता बरोबरच सामाजिक कार्यातही डॉ. गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या आदेशाने व सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख जावेद रज्जाक यांची पाटोदा ता.कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे,किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य कॉ.महादेव नागरगोजे, शेकापचे जिल्हा सरचिटणीस भाई विष्णूपंत घोलप, जेष्ठ पत्रकार अ.कादर मकराणी,विजय जाधव,हमीदखान पठाण, कॉ.गाडेकर मामा,महेमुद भाई नायगाववाले,चंक्रपाणी दादा,खालेद भाई,कॉ.अतुल देवडे,इलियास भाई,मोसिन भाऊ,वाजेद शेख, आदींनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत..