माझी दिवाळी अनाथ निराधारांसोबत जामखेड येथे निवारा बालगृहा मध्ये साजरी – प्रा. संजय साठे
पाटोदा | प्रतिनीधी
दिनांक 11/11/2023 वार रविवार रोजी पाटोदा येथील प्रा. संजय साहेबराव साठे ( जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड ) यांनी आपली दिवाळी प्रथम घरी न . साजरी करता जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा ( समता भुमी ) ता. जामखेड . येथील अनाथ निराधार मुलांना गोड फराळ देऊन एक अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली अनाथांची दिवाळी आनंदाची दिवाळी आपल्या घासातला एक घास गरीबांसाठी दिला जामखेड येथील निवारा बालगृहास सहकुटुंब भेट देऊन प्रतिवर्षी प्रमाणे निवारा बालगृहात माझी मुलगी डॉ. संकल्पना (आरती ) हिने निवारा बालग्रहातील आपल्या भावंडांना दिवाळीचा पहिला लाडू भरवून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात केली या वेळी बोलतांना प्रा. संजय साठे यांनी सांगितले की समाजातील दानशुर व्यक्तीने या बालग्रहास मदत करावी आपले वाढदिवस साजरे करतांना इतर खर्च न करता या निवारा बालगृहास मदत करून आपले वाढदिवस साजरे करावे यावेळी निवारा बालगृहातील कर्मचारी यांनी सर्वांचं आभार मानले यावेळी प्रा. संजय साठे सर सौ . क्रांती साठे मुलगा संकल्प साठे डॉ आरती साठे सा . शिवसंकेत चे संपादक सचिन गायकवाड साहिल लांडगे अशोक भाऊ थोरात रेणुका गायकवाड यांच्या सह निवारा बालगृहातील सर्व मुले हजर होती.