आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी शासनाकडून दहा लाख निधी मिळून देण्यासाठी आ.सुरेश धस यांचा पाठपुरावा
★मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी पाटोदा नगरपंचायत महाराष्ट्रातील पहिली!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांना आ.सुरेश धस आण्णा यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबींयाना शासकीय मदत मिळुन देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले तसेच मी आपल्याला एकटे पडु देणार नाही अशी ग्वाही दिली.मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी पाटोदा नगर पंचायत ही महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत आहे.तसेच मरठा आरक्षणासाठी आंतरवली सराटे येथे झालेल्या सभेला आ.सुरेश धस उपस्थित होते .म्हणून सर्व जाती धर्माच्या सुख दुखात आ.सुरेश धस नेहमीच अग्रेसर असतात.मराठा आरक्षणाच्या लढ्यात पाटोदा तालुक्यातील बलीदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना भेट व आधार देणारे आ.सुरेश धस हे पहिले आमदार आहेत अशी माहिती पाटोदा नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव यांनी दिली. नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे,बाळु धारीबा पचपुते रा.गांधनवाडी , पांचग्री येथील सुभाष मुंढे इत्यादी युवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत. लोकनेते आ.सुरेश धस आण्णा यांनी तिन्ही कुटुंबीयांना मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.प्रत्येक कुटुंबीयांना दहा लाख रुपये निधी मिळणार आहे. शेती शिवाय सुख नाही हे खरं असलं तरी एकर भर शेतीत कुटुंबाचा गाडा पूढे न्यायचा कसा? हा प्रश्न राज्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतमजुरी किंवा शेतीपूरक व्यवसाय आणि प्रसंगी ऊसतोडणी करुन उदरनिर्वाह करावा लागतोय. पाटोदा तालुक्यातील पाचंग्री येथील मुंढे वस्तीवर सुभाष मुंढे यांना १५ गुंठे जमीन आणि ऊसतोडणी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपली हलाखीची परिस्थिती आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून त्यांना उच्चपदस्थ अधिकारी बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. परंतु घरची हलाखीची परिस्थिती आणि मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.आज महाराष्ट्रभरात अशी परिस्थिती असलेले कै.सुभाष मुंढे एकटे नाहीत तर परिस्थितीला सामोरे जात मुलांचे भविष्य घडवण्यासाठी स्वप्न बघणारे लाखो वडील आहेत. आत्महत्या हा कोणत्याच अडचणीवर उपाय नाहीय.मराठा आरक्षण विषय आता निर्णायक वळणावर आलाय त्यामुळे मराठा समाजाच्या कोणत्याही युवकांनी आत्महत्या करू नये असे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले असल्याचे नगराध्यक्ष राजुभैय्या जाधव यांनी म्हटले आहे.
★पाटोदा तालुक्यातील तिन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा आश्वासन!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील गोविंद गोपीचंद ओटे, गांधनवाडी येथील बाळू धारीबा पाचपुते, पाचंग्री येथील सुभाष मुंडे इत्यादी युवकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून प्रत्येकी दहा दहा लाख रुपये मदत देण्याचे आमदार सुरेश धस यांनी आश्वासन दिले व कुटुंबीयांना आधार देऊन सांत्वन केले.