महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी आणि क्रांतिवीर भगतसिंग यांची पुनरावृत्ती !
★मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत चाललाय सरकार मात्र झोपेच्या सोंगत!
बीड | सचिन पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत असताना सरकार मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. मराठा आंदोलन अंतरवलीचा शब्द मोडत नाहीत त्या पद्धतीने शांततेत आंदोलन सुरू आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये आंदोलनाने उग्र अवतार घेतल्याने बीड जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू केले आहे. काही ठिकाणी महात्मा गांधीचे शस्त्र वापरलं जात आहे तर काही ठिकाणी क्रांतिवीर भगतसिंगांचं शस्त्र वापरून आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे यातून सरकारची झोप उडाली आहे हे मात्र नक्की आहे.
महाराष्ट्र सरकार आणि सर्व नेतेमंडळींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निघाली काढावा नाहीतर मराठ्यांचा गनिमी कावा सरकारच्या नेत्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही यातील मात्र शंका उरली नाही. त्यांनी देखील सोशल मीडियाचा वापर करत सरकारला सळोकी पळो करून सोडले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे यांची तब्येत खराब होत चालल्याने मराठा आंदोलकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे काही ठिकाणी महात्मा गांधी यांचे शांततेचे शस्त्र वापरत आंदोलन केले जात आहेत तर काही ठिकाणी क्रांतिवीर भगतसिंग यांचा शस्त्र वापरत उद्रेक होताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकार आहे याचा विचार करून पुन्हा गांधी भगतसिंगांची पुनरावृत्ती होऊ नये अन्यथा सरकारला काय करावं हे कळणार नाही लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून मराठा समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा हीच मराठा समाजातून भावना व्यक्त होताना दिसत आहे.
★कुणी गांधी तर कोणी भगतसिंग!
महाराष्ट्रामध्ये पुन्हा गांधी आणि भगतसिंग अवतरल्याचे पाहायला मिळत आहे शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र रूप घेताना दिसत आहे त्याचबरोबर काही मराठा बांधव जरांगे यांची प्रकृती खरात होत चालल्याने भगतसिंगांचे आंदोलन अमलात आणताना दिसत आहे एकूणच कोणी गांधी तर कोणी भगतसिंग होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा वेगळीच क्रांती घडेल यातही तीळ मात्र शंका उरली नाही.
★मराठ्यांचा गनिमी कावा!
बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून गनिमी कावा केला जात असल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ करून सरकारला सळो की फळ करून सोडण्याचे काम सुरू आहे. परंतु मनोज जरांगे यांचा आव्हान शांततेच्या मार्गाने असल्याने सर्व आंदोलन शांततेने करा असे देखील सुचवलं जात असलं तरी अनेक बांधवांनी जाळपोळ करून आंदोलन अधिक उग्र केल्याचे दिसत आहे. हा गनिमी कावा आहे का दुसरं काही यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे..
★मनोज जरांगे यांचा जीव कोटी मराठ्यांचा जीव!
महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांचा जीव म्हणजे जरांगे ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोरंजन यांनी शांततेचे युद्ध पुकारल आहे परंतु सरकार कसलीच दखल घ्यायला तयार नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे जशी जशी त्यांची प्रकृती खालावत जाईल तशी तशी मराठ्यांची तीव्रता अधिक वाढत जाईल त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निकाल काढावा अन्यथा पुढे काय होईल सांगता येत नाही असे देखील बोलले जात आहे.