सौ.सुरेखा अभयराजे पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड
बीड | प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, पाटोदा तालुक्यातील प्रतिष्ठित धनगर जवळका ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड सर्व गावकऱ्यांच्या एक विचाराने बिनविरोध करत सौ. सुरेखाताई अभयराजे पवार यांची सरपंचपदी निवड करून ग्रामस्थांने आशीर्वाद देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षणमहर्षी पी.एस.पवार सर यांच्या त्या सून असून सर्वसामान्यांच्या सदैव सेवेत तत्पर असणारे युवा नेतृत्व अभयराजे पवार यांच्या सुविद्य पत्नी आहेत, त्यांच्याच निस्वार्थ कामाचा आणि सर्व गावकऱ्यांचा त्यांच्या कार्यावर असलेल्या विश्वास पुन्हा एकदा या निवडीमुळे पाहायला मिळाला. गावातील प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ सहकारी लहानांपासून थोरा-मोठ्यांनी सर्व गावकरी मंडळींच्या एकमताने सुरेखाताईंची सरपंच पदी निवड करत सर्व गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा जबाबदारी दिली असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असेल असे याप्रसंगी मत त्यांनी व्यक्त केले.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्यावर असलेला जनसामान्यामधील विश्वास पुन्हा एकदा सार्थ या निवडीमुळे ठरला असून,गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


