18.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा आरक्षणाचा दुसरा अध्याय ना पेलणारा ना झेपणारा!!

सरकारचे 40 दिवस पूर्ण ; मराठ्यांचा गनिमी कावा सुरू

★उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन ; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

[ दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार होता, ते घेतली नाही अजून, आरक्षण कधी देणार ? ]

अंतरवाली सराटी | सचिन पवार

मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दाखल गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यांबाबतही शासन सकारात्मक आहे. परंतु, आपण आमरण उपोषण करू नये, अशी विनंती महाजन यांनी केली. परंतु,या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शासनाला दिलेल्या ४० दिवसांची मुदत संपली आहे. यामुळे ४१ व्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचे रूपांतर पुन्हा आमरण उपोषणात केले आहे. सरकारने ४१ दिवसानंतरही मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे, यासाठी आपला लढा सुरू आहे. परंतु, आत्महत्या होत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच नेतेमंडळींना गावबंदी करा, पण कायदा हातात घेवू नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले. दरम्यान, उपोषण सुरू करण्यापूर्वी जरांगे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. महाजन यांनी आणखी वेळ मागितला मात्र, जरांगे यांनी आता थांबणार नाही, आरक्षणाचा कागदच घेऊन या असे आवाहन करत उपोषण सुरू केले.

★मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद: 

मनोज जरांगे पाटील: आम्ही तुमचा सन्मान ठेवला, आमचा समाज काही चुकला नाही. आम्ही गरीब नाहीत का? आम्ही निकष पार केले नाहीत का? आमचे काय चुकले ते सांगा. गिरीश महाजन: मुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेऊन सांगितले.पण मी राजकारण करणार नाही.  मागच्या वेळी आपणच दिले आरक्षण, त्यानंतर काय झालं ते माहीत आहे.  चांगला निर्णय होईल.तुम्ही थोडे थांबा. टोकाचा निर्णय घेऊ नका. कायम स्वरूपी आरक्षण मिळत असेल तर थोडा वेळ द्या.

★ मराठ्यांचा गनिमी कावा!

मराठा आरक्षणासाठी सरकारने 30 दिवस मागितले होते परंतु मराठा समाजाकडून 40 दिवस देण्यात आले तरीदेखील सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्याने आता मराठा समाजाकडून आंदोलनाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आहे आता हे आंदोलन न पेलणार आणि न झोपणार आहे प्रत्येक गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करून नाग दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तर अनेक ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून सरकारला इशाराच दिला आहे. आता मराठ्यांच्या गनिमी काव्याचा तुम्ही निकाल आरक्षणातूनच देणार या तीळ मात्र शंका नाही..

★गावोगावी नेत्यांना प्रवेश बंदी!

महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आणि न झोपणार आंदोलन सुरू झाले आहे. प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण सुरू करून नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करून सरकारचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला आहे आता तोंड उघडलं की आरक्षण द्यावे लागेल अन्यथा गुदमरून मरून जाव लागेल हाच मराठा समाजाचा गनिमी कावा आहे.

★ज्या गावांमध्ये साखळी उपोषण सुरू नाही त्यांनी तात्काळ सुरू करा – सकल मराठा समाज

मनोज जरांगे यांनी पुकारलेलं न पेरणार न झोपणार आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू झाले आहे आता ज्या गावांमध्ये आंदोलन सुरू नाही त्यांनी लगेच साखळी उपोषणाला सुरू करून नेत्यांना गावबंदी करावी असं आव्हान सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!