★शालेय क्रीडा स्पर्धेत हुतात्मा देवराव विद्यालयाच्या खेळाडूंची धावण्याच्या स्पर्धेत भरारी
पाटोदा | प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यावर्षी हुतात्मा देवराव विद्यालयाच्या खेळाडूंनी चांगलीच भरारी घेतली. मानवत जिल्हा परभणी येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये हुतात्मा देवराव विद्यालयाचा खेळाडू गोकुळ गर्जे याने 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याच्या या उत्कृष्ट खेळाबद्दल संस्थेचे सचिव रामकृष्ण बांगर साहेब, सौ.सत्यभामाताई बांगर तसेच सर्व शिक्षक वर्गाने अभिनंदन कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हुतात्मा देवराव विद्यालयाचे खेळाडू विभागावर चमकले. गोकुळ गर्जे या खेळाडूने 3000 मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये विभागात प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाची व शिक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्याला खेळाचे योग्य मार्गदर्शन नितीन गर्जे यांनी केले तर सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन देत खेळामध्ये पुढे जाण्याचा सल्ला देखील दिला आहे. हुतात्मा देवराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जात असून येणाऱ्या काळात अनेक खेळाडू या शाळेतून घडावेत अशीच पालक वर्गातून अपेक्षा व्यक्त होत आहे.
★यापुढे देखील खेळात अनेक विद्यार्थी घडतील – प्राचार्य दिनकर बांगर
हुतात्मा देवराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून यापुढे देखील गोकुळ गर्जे सारखे अनेक विद्यार्थी खेळामध्ये चमकतील आणि घडतील यासाठी आमचे सर्व शिक्षक वर्ग परिश्रम घेत आहेत आणि विद्यार्थी देखील तितक्याच मेहनतीने खेळामध्ये आपली चुणूक दाखवत आहेत.
– प्राचार्य दिनकर बांगर
हुतात्मा देवरा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भायाळा.