★घटस्थापनेच्या दिवशी बहुतांश घटातील धान एकाच जागेवर!
शिरूर कासार | जीवन कदम
शहरात कासट परिवार आपल्या कुटूंबात नवरात्र घटस्थापनेला लागणारे धान्य मोफत सेवाभाव सदरातून वाटप करत असते हीच परंपरा आज चौथी पिढी देखील सांभाळत असुन रविवारी धानवाटपाची तयारी केली असुन सुमारे चाळीस पंचेचाळीस किलो धान्य तयार केले आहे ,घटस्थापनेच्या दिवशी शहरात एकाच जागेवर मिळत असल्याने सकाळपासूनच धान नेण्यासाठी लोक येत असतात.
गांधी चौकात किराणा दुकान सांभाळणारे हे कुटूंब येथील कालिका देवी व सिध्दश्वर या दैवतावर नितांत श्रध्दा बाळगुन आहे , शिवरात्रीला सिध्देश्वराची तर नवरात्रात कालिका देवीची सेवा करत असतात ,सेवेचाच एक भाग म्हणून नवरात्रात विठू राम कासट यांनी शंभर वर्षापुर्वी हे धानवाटपाचे वृत्त अंगिकारले तेव्हापासुन पुढे भगवानदास कासट ,शिवनारायण कासट व आता चौथ्या पिढीत तीच परंपरा जगदिश कासट व त्यांचा परिवार सांभाळत आहे. प्रथम हे धान कालिका देवीसाठी दिले जाते व नंतर वाटप सुरू होते आपापल्या वेळेनूसार धान घेऊन जात असतात ,दुकानात गि-हाईक आणि धान मागणारे एकाच वेळेस आल्यास ग्राहकाला थांबवून धान आधी दिले जाते.शहरात एकाच कुटूंबाने ही परंपरा सांभाळली असुन आजतागायत ती सुरूच आहे. कासट कुटूंबाचे तथा निरंतर सेवाभावी संस्थेचे जयेश कासट हे देखील आवर्जून नवरात्र काळात पुण्यावरून देवीच्या दर्शनासाठी रविवारीच हजर झाले व धानवाटपाची तयारी याबाबत चौकशी केली असता धान तयार केल्याचे दाखवले गेले. भिमाबाई कासट या आजी आजही आपली ही परंपरा अव्याहतपणे चालू रहावी यासाठी आग्रही असतात.
★घट धान म्हणजे काय ?
» घटस्थापनेसाठी देव घरात एका ताटात पळसाच्या पानाची पत्रावळी त्यात वावरी म्हणजे काळी माती ,घट म्हणजे छोटस कुंभारी गाडग किंवा तांब्याचे भांडे आणि या काळ्या मातीत ज्वारी, हरभरा, गहू, करडी, जवस, साळी, तसेच जव असे सात धान्य एकत्रीत केल्यानंतर धान संबोधले जाते.
» नवधान्याचा तूरा दुस-या दिवशी देवाला व पुरूषांचा टोपीला ऐटीत लावून सिमोलंघनासाठी जाण्याची ही जुनीच परंपरा आजही ग्रामीण भागात जोपासली जाते.
» भिमाबाई कासट यानी वयाची पंचाऐशी गाठली असली तरी उल्हास तरूण असल्याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही ज्ञानेश्वरी पारायण हा त्यांचा छंद कायम टिकून आहे .स्वत:बरोबर अन्य महिलांना सोबत घेऊन पारमार्थिक वाटचाल प्रेरणादायी ठरते आहे.