★संरक्षण भिंतीचे काम तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन – शेख इम्रान नूर
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा नगरपंचायत अंतर्गत राजमाता जिजाऊ नदीघाट सुधार योजना या योजने अंतर्गत नदीसौदंरीकरण करणे हे काम पाटोदा शहराच्या बाहेर चालू आहे, हे काम सार्वजनिक ठिकाणी होणे आवश्यक असताना ते गावा बाहेर चालू आहे फक्त शासनाच्या पैसा लुटणाचा हा प्रकार आहे,या कामाचे गुत्तेदार पाटोदा शहर वासियांना काय मुर्ख समजतात का? पाटोदा शहराच्या केंद्र स्थानी असलेली नदी या काठी माळेगल्ली, मुस्लिम मोहल्ला, बाजार तळ, तसेच अनेक लोकांची शेती आहे, वरच्या बाजूस लोकांची दुकाने आहेत या सर्वांचा विचार न करता तसेच यांना विचारात न घेता माळावरच्या देवी कडून हे काम चालू केले आहे.नदीचे खालच्या बाजूने काम करत असल्या मुळे नदीचे पात्र कमी झाले आहे, त्यामुळे नदी काठच्या लोकांना याचा धोका होणार आहे, याचा कसलाच विचार मा. मुख्याधिकारी व गुत्तेदार यांनी केलेला नाही यात खूप मोठा भरष्टाचार होत आहे मा. जिल्हाधिकारी यांनी हे काम तात्काळ बंद करावे नसता नगरपंचायत कार्यालया समोर तीव्र आंदोलन केले जाईल, याची सर्व जबाबदारी मा. मुख्याधिकारी यांची राहील असा इशारा निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते शेख इम्रान नूर यांनी दिला आहे.
★पाटोदा नगरपंचायतला नेमक काय सिद्ध करायचं ?
पाटोदा नगरपंचायत अनेक विविध बोगस कामातून प्रसिद्ध झाली आहे. सामान्य जनतेला त्रास होईल असे काम नगरपंचायत कडून सुरू आहेत. पाटोदा नगरपंचायत जनतेच्या हिताच काम करताना दिसतच नाही असंच म्हणावं लागेल. कोट्यावधीचे बोगस कामे करून जनतेला लुटायचं काम सुरू आहे तर काही बेकायदेशीर कामे करून जनतेला त्रास देण्याचे काम सुरू आहे असंच म्हणावं लागेल. कारण की अनेक आरोप नगरपंचायत वर झाले आहेत.
★बेकायदेशीर काम करताय पण विचारपूर्वक करा – शेख इमरान नूर
पाटोदा नगरपंचायत अंतर्गत नदीघाट सुधार योजने अंतर्गत नदीसौंदरीकरण काम करणं सुरू आहे परंतु त्या कामातून पाटोदा शहरवासीयांना मूर्खात काढण्यासारखे काम सुरू आहे. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे या कामाकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहून हे काम तात्काळ बंद करावे अन्यथा नगरपंचायत समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख इम्रान नूर यांनी दिला आहे.