★राज्यव्यापी दौऱ्यामध्ये मनोज जरांगे यांचा विश्वास
अंबड | प्रतिनिधी
आंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी १०० एकर जागेत मराठा समाजबांधवांचे आंदोलन होत आहे. यातून मराठ्यांच्या आरक्षणाची दिशा बदलेल. त्यामुळे या दिवशी सर्व मराठे तिथे आले पाहिजेत. आपली संख्या पाहूनच सरकारला पुढील १० दिवसांत आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल. समाजबांधवांनी आरक्षणासाठी दिलेले बलिदान आपण वाया जाऊ द्यायचे नाही. आपल्याला आरक्षण मिळणारच आहे, असा विश्वास मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.
अंबड शहरातील जळगावकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत हाेते. मराठा आरक्षणाचा लढा २९ ऑगस्टला सुरू झाला. मला समाजाच्या वेदना सहन होत नाहीत. आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण घ्यायचेय. आपण पहिल्यापासून ओबीसीतच आहोत. आपण वेगळी मागणी करतच नाही. सरकारने आपल्याकडे आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला आणि आपण दिला. अगोदर ४ दिवसच दिले होते, मात्र नंतर सर्वांच्या संमतीनेटिकणारे आरक्षण मिळवण्यासाठीसरकारला ४० दिवस दिले आहेत.कोणीही आत्महत्या करायची नाही.कारण आत्महत्या केली तर आरक्षणघेऊन काय करायचे? कायदा वसुव्यवस्था बिघडेल असे कामकरायचे नाही. सर्वसामान्य मराठातरुणांवर केसेस झाल्या तर मगशिक्षण तसेच नोकरीत अडचणीयेतात. सांडलेले रक्त वाया जाऊ देऊनका. आपल्याला मराठा समाजालाआरक्षण मिळवूनच द्यायचे. आता आपल्याला सावध राहावे लागेल,दूरदृष्टी ठेवावी लागेल. अण्णासाहेबपाटील, अण्णासाहेब जावळे,विनायक मेटे, वडजे यांच्यासहकाकासाहेब शिंदे अशा ४० ते ४५मराठा तरुणांनी आरक्षणासाठीबलिदान दिले. ते वाया जाऊ द्यायचेनाही. ४० दिवस थांबा, त्यानंतर आपणराज्यातील सर्व मराठ्यांना सरसकटकुणबी प्रमाणपत्रच घेणार, असा ठामनिर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्तकेला.
★अंबडमध्ये जोरदार स्वागत,दुचाकी रॅली
जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अंबडनगरीतून झाली. सकाळी मत्स्योदरी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन केले. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात श्री मत्स्योदरी देवी मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. कुंभार पिंपळगाव येथेही त्यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली.