★मराठवाडा रत्न पुरस्काराने आजोळ परिवारास सन्मानित
शिरूर कासार | जीवन कदम
शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथे आजोळ प्रकल्प चे संस्थापक अध्यक्ष कर्ण तांबे व त्यांच्या पत्नी ला मराठवाडा रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले.त्यांना हा पुरस्कार ठाण्यातील एका कार्यक्रमात महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, बीड जिल्ह्यातील भुमी पुत्र कृषी मंत्री मा.श्री. धनंजय मुंडे यांच्यासह इतर ही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला..या सन्मानामुळे त्यांचे शिरूर कासार तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरातील अभिनंदन होत आहे…सोशल मीडिया वर शुभेच्छा वर्षाव होत आहे.
बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींला पुरस्कार सन्मानित करण्यात आले त्यापैकी शिरूर तालुक्यात कर्ण तांबे हे आजोळ प्रकल्प चे आहेत.
त्यांनी निराधार वृद्ध बेघर झालेल्या व्यक्तीला मायेच्या छताखाली ठेवून आईवडील प्रमाणे सांभाळ करीत आहेत… मंतिमंद असलेला व्यक्तींना स्वतः आंघोळ घालून नवीन कपडे परिधान करतात… ओळख पटली तर त्यांच्या घरी पण घेऊन सोडतात… गावातील शाळा ही लोकवर्गणीतून दुरुस्ती केलेली . आठवडी बाजार सुरू करून जनतेला गावातचं सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन घेतला.. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी सहकार्य असते.अनेक कार्यक्रमात ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे कर्ण तांबे ओळखले जातात.. यांचं सेवेची दखल घेऊन त्यांना त्यासाठी मराठवाडा रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शनिवारी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. मा.एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सहपत्नी सोबत गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यासह राज्यातुन अभिनंदन केले जात आहे.