★पाटोदा येथील परिस्थिती; कृषी मंत्री धनंजय मुंडे,आ.बाळासाहेब आजबे यांनी लक्ष देण्याची गरज
पाटोदा | प्रतिनिधी
दि. २७ वर्षभरापासून कृषी कार्यालयात ऑपरेटर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाटोदा तालुका कृषी कार्यालयातील असून कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ. बाळासाहेब आजबे यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पाटोदा तालुका कृषी कार्यालयात एकही अधिकारी वेळेवर हजर राहत नाही. याठिकाणी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे. तसेच, गत वर्षभरापासून ऑपरेटर नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली जात आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागेल त्याला फळबाग योजना द्या असे फर्मान सोडले, मात्र कार्यालयात ऑपरेटर नसल्याने मस्टर भरण्यासाठी कोणीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळणार ? प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, कार्यरत आहेत ते अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने त्यांच्यावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याचे चित्र आहे. भर दुपारीच दरवाजे लावून कर्मचारी कार्यालयात मोकळे सोडून जातात, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
★आज-उद्या म्हणत उडवा उडवीची उत्तरे
माझी फळबाग २०२२ ला मंजूर झाली. मी फळबागेसाठी मस्टर भरण्यासाठी वारंवार कृषी कार्यालयात जात असून पण तिथे ऑपरेटर नसल्याने मला परत यावे लागत होते. अधिकान्याला विचारल्यास अधिकारी आज-उद्या म्हणत उडवा उडवीची उत्तर देत होते. कृषी कार्यालयात सर्व अधिकारी दांड्या मारत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
– राजेंद्र भवर, शेतकरी, मुगगाव.