★राज्यात यंदा 12 हजार 785 शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा लक्षांक निश्चित
पाटोदा | प्रतिनिधी
कृषी विभागामार्फत आत्म निर्भर पॅकेज अंतर्गत पंतप्रधान भारत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून राज्यात यंदा 12 हजार 785 शेतकरी,तरुण उद्योजक शेतकरी बचत गट,महिला बचत गट,शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देण्याचा लक्षांक निश्चित केला आहे. शेत मालावर प्रक्रिया उद्योग उभारणयासाठी सदर योजने अंतर्गत अगोदर बँक लोन मंजुर करणे आवश्यक आहे . बँक लोन मंजुर झाल्या नंतर लाभार्थ्यास योजनेचा लाभ दिला जातो.अर्ज कोण करू शकतात..कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी संस्था.कोणते अन्नप्रक्रिया उद्योग दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी. मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी. पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासूनचा प्रक्रिया उद्योग, जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रेडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात. तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी.कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे इत्यादी.राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे,ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवाशी, pan कार्ड,रे शन कार्ड, फोटो, जागेचा geo टॅग फोटो, शेडचे estimate, सात बारा 8 आ, ई.कागदपत्रे आवश्यक आहेत.सदर योजने अंतर्गत पुरुषांना 25% अनुदान आहे तर महिलांना 35% अनुदान आहे.प्रकल्प जास्तीत जास्त 25 लक्ष रु.पर्यंत करता येतो. सदर योजनेचा जास्तीत जास्त युवा उद्योजक, युवा शेतकरी,महिला उद्योजक,यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मित्र तथा नाथकृपा कृषी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आकाश गर्जे यांनी केले आहे.