★गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी – मंगेश पवार
★गुजरात/अहमदाबाद मध्ये स्व. देविदास पवार यांनी सुरू केलेली परंपरा कुसळंब मध्ये मुलगा मंगेश पवारांकडून कायम!
पाटोदा | प्रतिनिधी
सर्व हिंदू धर्मीयांचा पवित्र सण म्हणून श्री गणेश उत्सवाकडे पाहिले जातात तितक्याच मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा केला जातो. पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील स्वर्गीय देविदास पवार यांनी गुजरात येथे मुकादमकी करत असताना 1982 ते 1995 पर्यंत अखंडपणे गणरायाची स्थापना करून विसर्जनापर्यंत उत्कृष्टपणे पार पाडायचे. आता त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मंगेश देविदास पवार हा देखील कुसळंब मध्ये तीच परंपरा कायम ठेवत गणेश उत्सव साजरा करत आहेत. आपल्या घरी गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करून वडिलांनी सुरू केलेली परंपरा सुरू ठेवत वडिलांच्या आठवणीला उजाळा देत आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं हॅशटॅग देत पुन्हा त्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
★गुजरात ते कुसळंब श्री गणेशाचा प्रवास!
स्वर्गीय देविदास देवराव पवार यांनी गुजरातमध्ये मुकदमकी करत असताना सुरू केलेला गणेश उत्सव 1982 सालीपासून 1995 सालापर्यंत अविरत पणे आणि मोठ्या उत्साहात सुरू होता परंतु त्यांचं आपत्काली निधन झाल्याने तीच परंपरा त्यांचा मुलगा मंगेश देविदास पवार हा आज तगायत कुसळंब मध्ये स्वतःच्या घरी गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरा करून वडीलाच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत आहे.
★गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…
स्वर्गीय देविदास देवराव पवार यांनी गुजरात मध्ये गणेश उत्सवाची मोठ्या थाटात सुरुवात करून अखंडपणे चौदा वर्ष त्यांच्या कार्यकाळात गणेश उत्सव साजरा केला आता त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मंगेश पवार हा कुसळंब मध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून गणेश उत्सव घरी साजरा करत आहे नुकताच मंगेश यांनी फेसबुक वर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी हॅशटॅग देत जुने वडिलांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवातील काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केले आहेत.