★राजेंद्र मस्केंनी लिंबागणेश मयुरेश्वर गणेश विसर्जन मिरवणुकीत लुटला आनंद !
बीड | प्रतिनिधी
बीड विधानसभा मतदार संघातील लिंबागणेश येथे “एक गाव एक गणपती” सुमारे अडीचशे वर्षाची स्तुत्य परंपरा ग्रामस्थ मंडळी जपतात. गणेश उत्सवानिमित्त मयुरेश्वर श्री गणेशाची स्थापना करून, पाचव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करतात. उत्सवाची मूर्ती पर्यावरण पूर्वक असते. उत्सवमूर्ती गावातील स्वर्गीय माणिकराव कानीटकर यांचे घराणे वंश परंपरेनुसार बनवत आले आहेत. उत्सवासाठी मूर्ती विकत न घेता. स्वत: बनवलेली मूर्ती उत्सवासाठी वापरतात. लिंबागणेश गणेश भक्तांची ही परंपरा स्तुत्य असून, अनुकरणीय आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.
लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थानमुळे लिंबागणेश गावाला अध्यात्मिक ख्याती लाभलेली आहे. पाचव्या दिवशी विसर्जनाची परंपरा कायम राखत, आज सकाळी 12.30 वा. सामुदायिक आरती करून, सरकार वाड्या पासून भव्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या भव्य मिरवणुकीत राजेंद्र मस्के यांनी सहभाग घेतला. श्री मयुरेश्वर गणेशाचे दर्शन घेऊन, पालखीला खांदा दिला. फुगडी, लेजीम खेळत आनंद लुटला. या मिरवणुकीसाठी लिंबागणेश परिसरातील हजारो भाविक गुलालाची उधळण करत. आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत मयुरेश्वर गणेशाला निरोप देतात. यानिमित्ताने लिंबागणेश गावात यात्रेचे स्वरूप आले आहे.