★माजलगाव विधानसभा भा.ज.पा प्रमुख मोहन दादा जगताप यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण
किल्ले धारूर | सुरेश शेळके
धारूर शहरांमध्ये विविध गणेश मंडळातर्फे श्री गणेशाची स्थापना केली जाते यामध्ये अनेक गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहामध्ये श्री गणरायाची वाजत गाजत मिरवणूक करून स्थापना करतात. विविध गणेश मंडळे श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर सजावट देखील उत्तम प्रकारे करतात. अशाच प्रकारे गणेश मंडळ देखावा पारितोषिक स्पर्धेचे आयोजन किल्ले धारूर शहरांमध्ये करण्यात आले आहे यामध्ये नियम व अटी तसेच विषय देण्यात आले आहेत
१.गणेश मंडळ आराम देखावा करण्यात यावा रेडीमेड देखावा करण्यात येऊ नये.
२. पुरुष समानता स्त्रीभ्रूणहत्या थांबवा सुरक्षा संवर्धन याविषयी देखावे करावे
३. स्वच्छ भारत पाण्याची बचत शिक्षणाचे महत्त्व तसेच चंद्रयान -३ आदित्य १ मिशन यावर देखावे करावे
४. दुष्काळावर मात या विषयावर देखील देखावे करावे. सर्व विषयावर अनुसरून धारूर शहरातील गणेश मंडळ यांनी गणेश मंडळ देखावा पारितोषिक जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व सामाजिक संदेश पोहोचवण्याचे अनमोल असे कार्य करावे. माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते मोहन दादा जगताप यांच्याकडून गणेश मंडळ देखावा पारितोषिक प्रथम पारितोषिक १५५५५ , द्वितीय पारितोषिक १११११ तर तृतीय पारितोषिक ७७७७ ठेवण्यात आलेले आहे. या गणेश मंडळ देखावा पारितोषकाचे वितरण २२९ माजलगाव विधानसभा मतदार संघाचे प्रमुख मोहन बाजीराव जगताप यांच्या शुभहस्ते तसेच डॉ.डुबे साहेब , डॉ. स्वरूप सिंह हजारी, अर्जुनराव गायकवाड,उदयसिंह दिखत,महादेव शिनगारे सर, फसी भाई,बाळासाहेब खामकर ,शिवाजी अप्पा मुंडे,रुपेश चिद्रवार, मोहन भोसले, बाळासाहेब चव्हाण, दत्ता धोत्रे ,दीपक समर्थ,रामदास तिडके, बिबीशन बडे व सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे . तरी गणेश मंडळ देखावा पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुनराव गायकवाड, महादेव शिनगारे , बाळासाहेब गायकवाड , बालासाहेब जाधव , सुरेश बप्पा शेळके, यांनी केले आहे .
तरी धारूर शहरातील सर्व गणेश मंडळ यांनी गणेश मंडळ देखावा पारितोषिक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व पारितोषकाचा मानकरी होण्याचा बहुमान मिळवावा. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महादेव शिनगारे ९४२२७४५७०१, बाळासाहेब गायकवाड ९७३०४०५०५२, बालासाहेब जाधव ९४२३७००१५२, सुरेश बप्पा शेळके -९४२३१७१७४६ इत्यादी मान्यवरांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यात यावी व पारितोषिक स्पर्धेमध्ये स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
★देखावा सादर करण्यासाठीचे मुद्दे!
१.गणेश मंडळ आराम देखावा करण्यात यावा रेडीमेड देखावा करण्यात येऊ नये.
२. पुरुष समानता स्त्रीभ्रूणहत्या थांबवा सुरक्षा संवर्धन याविषयी देखावे करावे
३. स्वच्छ भारत पाण्याची बचत शिक्षणाचे महत्त्व तसेच चंद्रयान ४. आदित्य १ मिशन यावर देखावे करावे
५. दुष्काळावर मात या विषयावर देखील देखावे करावे.
★मोहन दादा नागरिकांच्या हक्काचं व्यक्तिमत्व!
माजलगाव मतदार संघाचे प्रमुख मोहन दादा जगताप नेहमी नागरिकांच्या विविध प्रश्नावर आघाडीवर राहिले आहेत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर, नागरिकांच्या धार्मिक प्रश्नावर, नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नावर नेहमीच मोहनदादा सर्वांच्या पुढे राहिले आहेत, त्यामुळे मोहन दादाच व्यक्तिमत्व नागरिकांच्या मनामनावर घर करून तयार आहे. येणाऱ्या काळात हेच हक्काचं घर मतदार संघात आमदारकीच्या रूपाने दिसन यात तीळ मात्र शंका नाही.