★शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मनसेची मागणी
शिरूर कासार | जीवन कदम
या वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन,मुग,उडीद,भुईमूग हे पिक पुर्णतः उध्वस्त झाली आहेत खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडीत निघाला आहे यामुळे तालुक्यात प्रशासकीय पातळीवर घोषणा करुन लवकर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.
सरासरीच्या तुलनेत तालुक्यातील सहा कृषी मंडळात ४०% देखील पाऊस पडलेला नाही शिरूर तालुक्यात असलेले सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून यामुळे पाणी टंचाई तीव्र होत आहे शासन व प्रशासनाला या प्रकराचे अजुनही गांभीर्य नाही यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे चारा प्रश्न देखील गंभीर बनलेला आहे यामुळे तालुका प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन येत्या 15 दिवसात दुष्काळ जाहीर करून पावसाअभावी उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची तरतूद करावी व तालुक्यात तीव्र पाणीटंचाई क्षेत्रात त्यांकरने पाणीपुरवठा व जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याचे देखील तयारी करावी अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आले आहे.
★मनसेचा प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम!
पावसाअभावी जळणाऱ्या शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने त्वरित काढावे व टंचाई निवारणाच्या कार्याला वेग द्यावा यासाठी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे.प्रशासनाकडून १५ दिवसात याबाबतीत कुठलेही कारवाई न केल्यास तालुक्यात मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
– सोपान मोरे
शिरूर कासार तालुका अध्यक्ष मनसे.