14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

किरण जावळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली मोफत पीक पाहणी

किरण जावळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली मोफत पीक पाहणी

आष्टी | प्रतिनिधी

आज दिनांक 17/9/2023 रोजी नांदा तालुका आष्टी येथील येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उच्चशिक्षित तरुण मा. किरण रविंद्र जावळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ई-पीक पाहणी या ॲपच्याद्वारे शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद करून घेतली व गावातील सुशिक्षित तरुणांना या ॲपचे व पीक पेरा नोंदीची माहिती समजावून सांगितली व तरुणांनी गावातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद करून घेण्यास आव्हान केले.
शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून पीक पेऱ्याची नोंदणी २५सप्टेंबर २०२३ पर्यंत करावीचं लागणार आहे, कारण या दुष्काळाचे सावट पाहता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या पीकाची नुकसान भरपाई पोटी राज्य सरकार पीक विम्याच्या मोबदल्यामध्ये २५टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याच्या विचाराधीन आहे, त्याकरिता पीक पेऱ्याची नोंद करणे खूप गरजेचे आहे. आधीच दुष्काळाच्या झळा शेतकरी शोषत असताना घरात आठरा विश्व दारिद्र्य यातच अधून-मधून अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे कायम परिस्थितीचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात मोबाईल फोनचं नाही, काहींच्या असला तरी परिपूर्ण माहिती नसल्यामुळे ही नोंदणी या बळीराजासाठी त्रासदायक ठरू लागली आहे, अशातच ग्रामीण भागातील अज्ञानी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या या अडचणीच्या काळात नांदा येथील शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारे युवक सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किरण जावळे हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक पेऱ्याची नोंदणीचं करता येत नाही, त्यांना विनामूल्य मोफत स्वतःच्या मोबाईल मधून आता पर्यंत 100 हुन अधिक शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे यामुळे नांदा येथील शेतकऱ्यानां या पीक पेऱ्याच्या त्रासातून काही प्रमाणात सुटका होत आहे. युवक सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार किरण जावळे हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात आणि या पुढील काळात पीक पेऱ्याची नोंदणी करताना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास आपण सदैव तयार राहू असा विश्वास देतानाच गावातील सर्व शेतकऱ्यांनी नोंदीसाठी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. यासाठी त्यांना नांदा सज्जाचे तलाठी श्रीमती.नंदा शिंदे मॅडम,कृषी सहाय्यक अधिकारी मा. देवकर साहेब साहेब व ग्रामविकास अधिकारी कवडे मॅडम,शरद औटे साहेब पोस्टमास्तर तसेच नांदा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!