★मराठ्यांच्या कुळात जाऊ नका ; सगळे मराठा 96 कुळीच!
[ राणेसाहेब मराठ्यांनी तुम्हाला खूप प्रेम दिल आता मराठ्यांना प्रेम देण्याची तुमची वेळ! ]
★सोशल मीडियावर नारायण राणे यांची मराठा युवकांकडून हजामत!
★ सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे – किशोर पिंगळे
बीड | सचिन पवार
महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशांमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. मराठा समाजाचे नेते मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांत आहेत. पण सर्वसामान्य मराठा मात्र रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढत आहे. त्यातच नारायण राणे सारखे तथाकथित मराठा नेते समजणारे मधीच आपलं तोंड उचलून समाजामधील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही म्हणत आपलं खराब तोंड पुन्हा उचलला आहे. पण अशा नेत्यांनी स्वतःच तोंड शांत करून आरक्षणाच्या बाजूने बोलता येत नसेल तर नका बोलू पण स्वतःच तोंड कुठेही उचकून समाजाची दिशाभूल करू नका आणि तुम्ही पाहिलं 96 कुळी मराठा का 92 कुळी हे तुमचं तुम्ही ठरवा पण महाराष्ट्रातील सर्वच मराठी 96 कुळी आहेत आणि त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र घ्यायचा आहे आणि तो सर्व सामान्य मराठा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा कडक इशारा मराठा सेवा किशोर पिंगळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेत्यांनी आता त्यांची तोंड आरक्षण मिळवण्यासाठी जर उघडता येत नसतील तर त्याच्यात आपले खराब तोंडे उघडून समाजाला आरक्षणापासून दूर करण्यासाठी तरी उघडू नयेत अन्यथा मराठा समाज तुम्हाला जशास तसे उत्तर दिले यातील मात्र शंका नाही. नारायण राणे सारख्या नेत्यांमुळेच मराठा आरक्षण हे रेंगाळत पडत चालले आहे त्यांच्यासारखे असे गुपित कांड करणारी नेते हे मराठा समाजाला धोकादायक असून त्यांची अवकात मराठा समाजाला लक्षात येऊ लागली आहे आता मराठा समाज त्यांना त्यांची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे स्वतःच खराब तोंड उघडून मराठा समाजाच्या मुळावर येईल असं वागू नये नाहीतर मराठा समाज तुमच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा सेवा किशोर पिंगळे यांनी दिला आहे.
★मराठा शांत आहे शांतच राहू द्या ; नाहीतर पेटल्यावर विजणार नाही
मराठा समाज शांततेने आपल्या हक्काचे आरक्षण मागत आहे. महाराष्ट्रातील काही स्वतःला मराठ्यांचे नेते समजणारे आरक्षणात दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा समाजाकडून इशारा देण्यात येत आहे की आपण आरक्षण मिळवण्यासाठी पुढे येत नाहीत परंतु आरक्षण मोडकळीच काढण्यासाठी पुढे येतात याद राखा मराठा समाजाला आरक्षण मिळवताना तुम्ही जर तिथे काही खोड करत असाल तर तुम्हाला तुमची जागा मराठा समाज लागलीच दाखवून देईल यात शंका नाही त्यामुळे तुम्ही तुमची पात्रता ओळखून काम करत राहा अन्यथा तुम्हाला जागा दाखवून दिली जाईल असा इशारा मराठा समाजाकडून दिला आहे.
★नारायण राणेंचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार
सोशल मीडियावर नारायण राणे यांचा चांगला समाचार घेतलेला दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा असून त्यावर मराठा नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय तिखट आहेत, त्यामुळे मराठा समाजातील सर्वसामान्य युवकांकडून अशा नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलेला दिसत आहे. नारायण राणे यांनी केलेली विधान हे निंदनीय असून मराठा समाजाला वेदना देणारे आहेत त्यामुळे युवकांनी नारायण राणे यांचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला आहे.
★मराठ्यांच्या नेत्यांनो तुम्हाला मराठ्यांनी भरपूर दिलं तुमची समाजाला गरज!
मराठा समाज जितका प्रेमळ आहे तितका कठोर देखील परंतु आज मराठा समाज अतिशय संयम आणि भूमिका घेत आहे. मराठा समाजाने आज पर्यंत सर्वच समाजातील नेत्यांना भरपूर प्रेम दिल त्याच पद्धतीने आता तुमची वेळ आहे. मराठा समाजाला खूप गरज असताना आता तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावं एवढीच मराठा समाजाची भावना आणि अपेक्षा आहे. भविष्यकाळात सुद्धा मराठा समाज तुम्हा सर्वांना भरपूर देईल यातही शंका नाही, परंतु आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला गरज आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावे एवढीच विनंती..