आमदार आजबेंचा विकास कामात नाद नाय करायचा !
★ना भूतो ना भविष्य दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी!
★आष्टी मतदारसंघाचे भाग्य आमदार बाळासाहेब आजबे उजाळणार!
★छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाची बैठक आष्टी मतदारसंघासाठी फलदायी!
आष्टी | सचिन पवार
छञपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी 59 हजार कोटी तर त्यापैकी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील विविध विकासकामासाठी 1907 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..
याबाबत पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आपण मतदार संघातील आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विविध विकास कामांचे प्रस्ताव, आपल्या पत्रांवर मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब,माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब मा ना धनंजयजी मुंढे साहेब यांच्याकडे केली होती त्यामधी खुंटेफळ साठवण तलाव 1357 कोटी रुपयांची निविदा येत्या दहा ते पंधरा दिवसात निघणार असून उर्वरित आठशे कोटी रुपयांच्या विकास कामांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,मा ना धनंजयजी मुंढे साहेब आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार संघातील विकास कामाला मंजूर दिल्याबद्दल आपण राज्य सरकारचे मतदार संघातील जनतेच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो यामध्ये मतदार संघाचे भाग्य उजळणार असून आपण मतदारसंघातील विकास कामासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले..
★ना भूतो ना भविष्य दोन हजार विकास कामासाठी मंजूर..
1 )आष्टी तालुक्यातील को.पं बंधाऱ्याचे लातूर मध्ये बॅरेज मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रत्येक प्रत्येकी 60 कोटी असे एकूण 360 कोटी…
2)शिरूर ता. येथील ब्रम्हनाथ येंळब व निमगाव ( मा ) येथील लातूर बॅरेज साठी प्रत्येकी 30 कोटी म्हणजे दोन्ही चे 60 कोटी..
3)आष्टी उपजिल्हा रुग्णालयासाठी 35 कोटी मंजूर…
4 )पाटोदा येथील प्रशासकीय इमारती इमारत 30 कोटी मंजूर..
5 )पाटोदा तालुका रोहतवाडी साठवण तलावासाठी 19 कोटी..
6 )पाटोदा तालुका उंबरविहीरा साठवण तलावासाठी 15 कोटी..
7 ) आष्टी येथे 38 कोटी रुपये शेतीपूर्वक एमआयडीसी साठी….
8)एमआयडीसी आष्टी व पाटोदा येथील पायाभूत सुविधानासाठी निधी उपलब्ध होणार..
9 ) शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईप लाईन व खुंटेफळ साठवून तलाव निविदा लवकरच प्रसिद्ध करणार 1350 कोटी..
★राज्य सरकारचे विशेष आभार – आ.बाळासाहेब आजबे
आष्टी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या मागण्या ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस नक्कीच त्या माझ्याकडून पूर्ण हव्यात ही इच्छा असते परंतु राज्य सरकार सकारात्मक असेल तर जनतेचे कठीण प्रश्न सुद्धा सहजासहजी सुटतात. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जनतेने माझ्याकडे मागणी केलेल्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नावर लक्षवेधक दोन हजार कोटींची मंजुरी विकास कामांना करून घेतली सरकारने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा माझ्या मतदार संघातील जनतेचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे आणि सर्व मंत्रिमंडळाचे विशेष आभार…
– आ.बाळासाहेब आजबे
आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ.
★आम्हाला हक्काचा अन् विकासभिमुख आमदार मिळाला
आष्टी मतदारसंघातील जनतेकडून आमदार बाळासाहेब आजबे यांचे विशेष कौतुक केलं जात असून त्यांचे आभार देखील व्यक्त केले जात आहेत. मीडियावर आमदार बाळासाहेब आजबे यांना हक्काचा आणि विकासभिमुख आमदार म्हणून संबोधले जात आहे. मतदारसंघाचा राहिलेला विकास आमदार बाळासाहेब आजबेच भरून काढतील अशा सुद्धा अपेक्षा आणि विश्वास जनतेकडून व्यक्त होत आहे.