एल्गार!
वेदनेच्या फुलांची मी
आरास आहे मांडलेली
जखमांच्या अत्तराची मी
कुप्पी आहे खोललेली.
भळभळणाऱ्या जखमांचा
सुवास सुगंधी आहे
झेलून या वेदनांना
जीवनात आनंदी आहे.
फुलें ही जखमांची
मला आहेत भेटलेली
वादळी प्रवासात मी
आहेत ती वेचलेली.
स्वकीयांनीच मुळावर
घाव आहेत घातलेले
माझ्या सहनशक्तीचे गुपित
अजून नाही उमगलेले.
नात्याचे बंध टिकवण्या
मी शांत राहिलो आहे
घाव झेलून देखील
आपले समजलो आहे.
वेदनेचा बाजार मी
आता मांडणार नाही
माझ्या हक्काचे आरक्षण
मुळीच सोडणार नाही.
आली जरी अडथळे
मी आता चालणार आहे
आरक्षणाची शर्यत आता
मीच जिंकणार आहे!
– प्रा.पंजाबराव येडे