★जिल्हाभरातील विविध संघटना भेटून सर्व ताकतीने देतायत पाठिंबा !
पाटोदा | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही या ठिकाणीं मराठा तरुण मावळ्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलेले आहे. नऊ दिवस अन्नत्याग केल्याने त्यातील दोन उपोषणकर्त्यां तब्येत बिघडली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून बहुजन समाज डोंगरकिन्ही येथे भेट घेवुन तब्येतीची विचारपूस करून पाठींबा देत आहे तर सरकारचा निषेध करत आहे. यावेळी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठ्यांचे सेनापती क्रांतीसुर्य समाज भूषण श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी डोंगराकिन्ही येथील श्री.आर आर येवले व श्री.प्रभाकर येवले हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित श्री जाधव साहेब सी ए तसेच नारायणगडाचे विश्वस्त तसेच बिड जिल्हा मराठा समन्वयक मराठा सेवक श्रीमान मंगेश पोकळे वकील साहेब,श्री रविराज गवते पाटील श्रीमान धांडे सर, श्रीमान कुडके सर तसेच श्रीमान खेडकर सर यांनी आपल्या प्रतिक्रिया लिहून आपला पाठींबा दर्शविला आहे.