14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

खुंटेफळ प्रकल्प ; शेतकऱ्यांच्या जीवनातील हरितक्रांतीचा झरा!

हरितक्रांतीचे दरवाजे उघडणार ; खुंटेफळ प्रकल्पाची निविदा लवकरच – आ.बाळासाहेब आजबे

★आष्टी मतदारसंघाची दैना दूर करणारी खुंटेफळ तलावाच्या निविदाला हिरवा कंदील!

★खुंटेफळ प्रकल्पाचे श्रेय सर्व नेते व चळवळीतील कार्यकर्त्यांचे

आष्टी | सचिन पवार

आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावातील शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईपलाईन योजनेच्या निविदेबाबत आपण आज जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव कपूर साहेब यांच्याशी चर्चा केली व तत्काळ निविदा काढण्याची मागणी केली असता त्यास त्यांनी हिरवा कंदील दर्शवत येत्या काही दिवसात निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले त्यामुळे मतदारसंघाची दैना फेडणारा हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे याकामी मतदारसंघातील सर्वच नेत्यांचे व या चळवळीतील सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांचे योगदान असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील महत्त्वकांक्षी खुंटेफळ प्रकल्पासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईप लाईन कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यासंबंधी मागणी केली त्यास आज खऱ्या अर्थाने यश आले असून राज्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव कपूर साहेब यांच्याकडे बसून या निविदेबाबत तात्काळ निविदा काढावी अशी विनंती केली असता त्यांनी त्यास हिरवा कंदील दर्शवत लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले त्यामुळे हे काम मार्गी लागले असून या कामासाठी आजपर्यंत मतदार संघातील सर्वच पक्षातील नेतेमंडळी व या चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे योगदान आहे मी आमदार या नात्याने पुढाकार घेऊन पाठपुरावा करून हे काम पूर्ण होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आजपर्यंत सर्वांनीच या कामासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे या कामाचे श्रेय माझे एकट्याचे नसून सर्वांचेच आहे ही योजना पूर्ण होणे हे आपल्या सर्वांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे, यामुळे मतदार संघातील माझा शेतकरी राजा सुखावणार आहे व या भागातील दुष्काळ काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यापुढेही आपल्या वाट्याचे चार टीएमसी पाणी आणण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी यावेळी बोलताना सांगितले ,पुढे बोलताना आमदार आजबे म्हणाले की येत्या काही दिवसात या कामाची निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे त्यासाठी ही सर्वच नेत्यांचे सहकार्य गरजेचे आहे सर्वांनी मिळून एकत्र येऊन कोणतेही काम हाती घेतले तर ते मार्गी लवकर लागते, हे महायुतीचे सरकार आपल्यासाठी सकारात्मक असल्याने आपल्या मतदारसंघातील अनेक मोठी कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आपण हाती घेणार आहोत ,त्यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे आग्रह धरणार असून त्यांनी या प्रकल्पाला होकार दर्शवल्यास आष्टी तालुक्यातील सर्व क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आपण वरिष्ठांची चर्चा करून लवकरच या प्रकल्पाबाबतही योग्य वेळी घोषणा करणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सांगितले.

★शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प!

आष्टी मतदारसंघातील माझ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प बाळासाहेब आजबे काका यांनी हाती घेतला असून त्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आग्रह धरून त्या प्रकल्पाला होकार सुद्धा दर्शवला आहे तसेच या प्रकल्पाची योग्य वेळी घोषणा करणार असल्याची माहिती सुद्धा आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी दिली आहे.

★सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे शक्य!

आष्टी मतदार संघाची दैना फेडणारा हा खुंटेफळ प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आष्टी मतदार संघातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे शक्य होत आहे. सर्वांचेच योगदान तितकेच महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी अति हिताचा आणि महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प असल्याने अधिक आनंद असल्याच्या भावना देखील आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!